esakal | नोटांवर स्प्रे करताय तर...जरा थांबा 

बोलून बातमी शोधा

Cleaning Money With Hand Sanitizer.jpeg}

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दोन महिने देश लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यामुळे या कोरोनाच्या गंभीर संकटामुळे सारेच जण धास्तावले आहे. लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली असली तरी आता मास्क, सॅनिटायझर हे आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग बनले आहे.

नोटांवर स्प्रे करताय तर...जरा थांबा 
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नागपूर  ः गेल्या अडीच महिन्यापासून संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोना हा ससंसर्गजन्य आजार असल्याने त्याची लागण होऊ नये म्हणून प्रत्येक जण खबरदारी घेत आहे.  मात्र काही व्यापारी, विक्रेते व डॉक्‍टर्स ग्राहकांकडून नोटा घेतल्यानंतर त्यावर सॅनिटायझर स्प्रे मारत आहे. स्प्रेमुळे नोटांचा रंग उडून त्या बाद होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे एक नवीन संकट निर्माण होण्याची शक्‍यता आहे. 

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दोन महिने देश लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यामुळे या कोरोनाच्या गंभीर संकटामुळे सारेच जण धास्तावले आहे. लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली असली तरी आता मास्क, सॅनिटायझर हे आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग बनले आहे. त्यामुळे बहुतेक जण कपड्यांवर, वापरातल्या वस्तूंवर इतकंच नाही तर नोटांवर सुद्धा सॅनिटायझर स्प्रेची फवारणी करत आहे. विशेष करून खबरदारीचा उपाय म्हणून दुकानदार, व्यापारी, डॉक्‍टर वर्ग हे नोटांवर सर्रासपाने सॅनिटायझर स्प्रे मारत आहे. पण सॅनिटायझरच्या अतिवापराने नोटांचा रंग उडत आहे. या स्प्रेच्या अतिवापराने नोटा बाद होतील अशी भीती देखील वर्तवण्यात येत आहे त्यामुळे नागरिकांनी नोटांऐवजी हातावर सॅनिटायझर घेणे आवश्‍यक आहे. 

गुड न्यूज : ३७६ लाभाथ्याच्या बॅंक खात्यात जमा हाेणार एक काेटी ८८ लाख रुपये, कशाचे िमळणारे अनुदान, वाचा..

सॅनिटायझर स्प्रेचा अतिवापर 

सध्या सॅनिटायझरचा वापर वाढला आहे. याचा वापर आवश्‍यक तितक्‍याच प्रमाणावर आणि आवश्‍यक त्याच ठिकाणी करणे गरजेचे आहे. दरम्यान सॅनिटायझरचा असाच अतिवापर होत राहिला तर हळूहळू चलनी नोटा बाद होऊ शकतात. कोरोनाच्या भीतीने नोटांवर सॅनिटायझर स्प्रे फवारत असाल तर जरा थांबा त्यामुळे नोटा खराब होऊ शकतात असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे 

नोटांऐवजी हात सॅनिटाइज करा 

नोटांची सर्वाधिक देवाण-घेवाण बॅंकेत होत असते. मात्र, नोटांमुळे संसर्ग होतो असे अद्याप लक्षात आलेले नाही. तसेच आरबीआयने देखील याबाबत काही सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांनी नोटांऐवजी नागरिकांनी हाताला सॅनिटायझर लावावे असे आवाहन बॅंक अधिकाऱ्यांमार्फत केले जात आहे.