गुड न्यूज : 376 लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा होणार एक कोटी 88 लाख रुपये, कशाचे मिळणारे अनुदान, वाचा...

file
file

मौदा (जि.नागपूर) :  मागील दोन वर्षांपासून समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद नागपूर येथील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आंतरजातीय विवाह योजनेचे शेकडो लाभार्थी लाभापासून वंचित होते. त्यांच्या मागणीची आता दखल घेण्यात आली असून सुमारे एक कोटी 88 लाख रुपये जमा होणार असल्याचे कळते.

अधिक वाचा: भयंकर...वीस वर्षीय युवतीचा साठ वर्षीय वृद्‌धाने केला बलात्कार

दोन वर्षांपासून लाभार्थी होते वंचित
या योजनेअंतर्गत प्रत्येक आंतरजातीय नवविवाहित जोडप्यांना केंद्र सरकारकडून पंचवीस हजार आणि राज्य सरकारकडून पंचवीस हजार असे एकूण पन्नास हजार रुपयांचे अर्थसाहाय्य केंद्र आणि राज्य सरकारकडून दिले जाते. जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुकेशनी तेलगोटे यांनी दिलेल्या माहितीनुसार गत वर्षात2020च्या मार्चमध्ये केंद्र सरकारकडून 94 लाख रुपये तरतूद प्राप्त करून देण्यात आली आहे. ही तरतूद आहारीत करून राज्य सरकारचीही समप्रमाणात 94 लाख रुपयांची तरतूद आहारीत करण्यात आली आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात 376 लाभार्थ्यांना प्रोत्साहनपर निधी देणे शक्‍य आहे. या बाबीवर विभागाने प्रथम प्राधान्याने कारवाई करणे सुरू केलेली आहे. लाभार्थ्यांना समाजकल्याण विभागात सर्व मूळ कागदपत्रे घेऊन कार्यालयात बोलावणे सुरू आहे. आता लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात सरळ पन्नास हजार रुपये जमा करण्याबाबत कार्यवाही होत आहे. 376 लाभार्थ्यांच्या व्यतिरिक्त प्रलंबित असलेल्या 650 लाभार्थ्यांच्या प्रस्तावांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासनस्तरावर कार्यवाही सुरू आहे. पुरेशी तरतूद प्राप्त झाल्यावर दिनांकनिहाय प्राप्त अर्जाच्या प्रधान्यक्रमानुसार अर्ज निकाली काढण्यात येतील. कारण एकूण1026 आंतरजातीय विवाहित जोडप्यांचे अर्ज कार्यालयात आतापर्यंत प्राप्त झालेले आहेत.

अधिक वाचा : (video)गुमगाववासीयांना आजही पावसाळयात सहन कराव्या लागतात या वेदना...

निखिलला मिळाला न्याय
नेरला येथील नागरिक निखिल सुरेश शिंदे यांनी 20एप्रिल 2018ला आंतरजातीय विवाह केला. परंतु, त्यांची आर्थिक परिस्थिती फारच हलाखीची असल्यामुळे त्यांनी जिल्हा परिषदेतील समाजकल्याण विभागात आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत अर्थसाहाय्य मिळण्याबाबत 11 ऑक्‍टोबर 2018 ला अर्ज दाखल केला होता. परंतु, जिल्हा परिषद नागपूर येथील समाजकल्याण विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या लापरवाहीमुळे मागील दोन वर्षांपासून या लाभार्थ्याला प्रोत्साहन अनुदान प्राप्त झालेले नव्हते. अर्जदार निखिल शिंदे यांनी समाजकल्याण विभागात मागील दोन वर्षांत सात ते आठ वेळा याबाबत भेटी दिल्या. परंतु, समाजकल्याण विभागातील कर्मचाऱ्यांनी त्यांना तारीखवर तारीख देऊन निराश केले होते. शेवटी त्रस्त झालेल्या निखिल शिंदे यांनी चाचेर सर्कलचे सामाजिक कार्यकर्ते रोशन मेश्राम यांची भेट घेतली व त्यांना संपूर्ण आपबीती सांगितली होती. मेश्राम यांनी पुढाकार घेऊन हे प्रकरण लावून धरले. आता कुठे त्यांना न्याय मिळाला.

हेही वाचा : हिरवे स्वप्न फुलण्यापूर्वी जमिनीतच "दफन' झाले बियाणे, असे काय झाले...

पाठपुरावा करणारच !

जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांनी जोडप्यांना लाभ मिळवून देण्याबाबत सकारात्मक सहकार्य केले. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद व उर्वरित लाभार्थ्यांना लाभ मिळण्याबाबत मी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे पाठपुरावा करेल.
रोशन मेश्राम
सदस्य, ग्रामपंचायत नेरला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com