esakal | तीन दिवसांपासून कॅज्युअल्टीच्या कोपऱ्यात पडलीये महिला; ना कोणी विचारत ना आजाराचे निदान

बोलून बातमी शोधा

ignorance to the non covid patients in government medical college nagpur

गीताबाई पवनकर असे या महिलेचे नाव आहे. मेडिकलमध्ये ८ एप्रिलरोजी कॅज्युल्टीत आणले. तेव्हापासून तर आजपर्यंत कॅज्युल्टीतच तिला ठेवण्यात आले आहे.

तीन दिवसांपासून कॅज्युअल्टीच्या कोपऱ्यात पडलीये महिला; ना कोणी विचारत ना आजाराचे निदान

sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) गैर कोरोना रुग्णांवर योग्यरित्या उपचार होत नसल्यामुळे त्यांचा जीव टांगणीला आला आहे. मागील तीन दिवसांपासून कॅज्युल्टीत महिला आहे. परंतु, तिला वॉर्डात हलवले नाही. केवळ ऑक्सिजन मास्क लावून तिला कोपऱ्यात ठेवले आहे.

हेही वाचा - सोनेरी पहाट आणि उंच गुढीचा थाट! अशा पद्धतीनं करा गुढीची शास्त्रयुक्त पूजा; जाणून घ्या 

गीताबाई पवनकर असे या महिलेचे नाव आहे. मेडिकलमध्ये ८ एप्रिलरोजी कॅज्युल्टीत आणले. तेव्हापासून तर आजपर्यंत कॅज्युल्टीतच तिला ठेवण्यात आले आहे. केवळ ऑक्सिजन माक्स लावून तिला तेथेच ठेवण्यात आले. मात्र, या महिलेला होणाऱ्या आजाराचे निदानही करण्यात आले नाही. कोणत्या चाचण्या करावयाच्या यासंदर्भात कोणतीही भूमिका डॉक्टरांनी घेतली नाही. यामुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या गर्दीत इतर आजाराच्या रुग्णांनी उपचारांशिवाय मरायचे का? असा सवाल नातेवाईक विचारत आहेत.

हेही वाचा - "माझ्यामुळे अन्य कुणालाही कोरोना होऊ नये म्हणून मी आत्महत्या करत आहे"; मन सुन्न करणारी...

अत्यवस्थ रुग्णांवरच उपचार करण्यात येतील असे सांगण्यात येत असताना, मागील तीन दिवसांपासून कॅज्युल्टीत असलेल्या महिलेवर कोणतेही उपचार करण्यात आले नाही. यामुळे एकप्रकारे नॉन कोविड रुग्णसेवा थांबवण्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे. यासंदर्भात मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करण्यात येणार आहे.
-अनिकेत कुत्तरमारे, संयोजक, दक्षिण नागपूर विकास आघाडी, नागपूर.