कामठी परिसरातील अवैध देहव्यवसायाला अभय कुणाचे? पोलिस विभागाकडून दुर्लक्ष 

illegal crime is going on in kamptee police ignoring the situation
illegal crime is going on in kamptee police ignoring the situation

कामठी (जि. नागपूर). : नागपूर शहर पोलीस आयुक्तालयात येणाऱ्या काही परिसरात गुप्तचर पद्धतीने सुरू असलेल्या देह व्यवसाय अड्यावर धाड घालत पर्दाफाश करत कित्येक देहव्यवसाय उघडकीस आणण्यात सामाजिक सुरक्षा पथक तसेच पोलिस विभागाला यश प्राप्त झाले असले तरी नागपूर पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कामठी शहरातील काही परवाना धारक लॉज, कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या काही भागांमध्ये देहव्यवसाय वाढताहेत. 

घोरपड रोड, कळमना मार्गावर, खैरी गावाच्या कडेला, गुमथळा मार्गावर तसेच अनधिकृत असलेल्या पॉश बिल्डिंग मध्ये विश्रांती थांबाच्या नावावर गुप्तचर पद्धतीने सुरू असलेल्या देहव्यवसायाला उधाण आले असून स्थानिक पोलिसांच्या अभयपणामुळे हे देहव्यावसाय चांगलेच वाढत चालले आहे. 

बदलत्या काळानुसार संस्कृती लोप पावत असून शहरात व्यभिचाराला वाव मिळत आहे दिवसागणिक वाढलेल्या गरजा बघता आर्थिक टंचाई तसेच झटपट श्रीमंतीच्या हव्यास्या पोटी काही गरजवंत तर काही हौशी युवती महिला देह व्यवसायाचा आसरा घेत आहेत. मात्र पोलिस विभाग याकडे डोळेझाक करीत असल्याचे चित्र सध्या कामठी शहरात पहावयास मिळत आहे.

शहराच्या २० ते २५ की मी परिसर अंतरावरील गावातील काही तरुणी व महिला कामठी येथे येऊन आपले देहजाळ शहरात पसरवीत आहेत या व्यवसायातील अनेक दलाल सक्रिय होऊन कॉलेज तरुणींना आपल्या मोहजाळ्यात अडकवून छुप्या देह व्यवसायात अडकवीत आहेत. मागील काही दिवसांपूर्वी डीसीपी स्कॉड ने रमानगर येथे गेल्या कित्येक महिन्यापासून गुप्तचर पद्धतीने सुरू असलेल्य घरी धाड घालून देह व्यवसाय उघडकीस आणला 

तसेच मागिल वर्षी कुंभारे कॉलोनी, यशोधरानगर, कामठी नागपूर रोडवरील लॉज आदी ठीकानी पोलिसांनी धाडी घातलेल्या आहेत. तर काही ठिकाणी हा व्यवसाय राजरोसपणे सुरू असल्याचे पोलिस ठाण्यात आलेल्या तक्रारीवरून निष्पन्न झाले होते. असाच प्रकार नवीन पोलिस ठाण्याच्या हद्दीत नोव्हेंबर महिन्यात घडला होता.त्यानंतर मात्र पोलीस विभागाने ध्रुतराष्ट्र रूप धारण करून वेश्याव्यवसायावर लगाम घालण्यासंबंधीचे कुठलेही ठोस पावले उचलले नाही 

तर आजही काही पॉश फॉर्म हाऊस वर बिनधास्तपणे देहव्यावसाय सुरू आहे हा व्यवसाय उघड नसला तरी छुप्यापद्धतीने सुरू असलेल्या या व्यवसायावर पोलिसांनी करडी नजर ठेवून या देहव्यावसायाला प्रतिबंध घालने गरजेचे आहे या व्यवसायाने दिवसगाणिक उग्र रूप धारण केले असून यात अनेक महाविद्यालयीन व गरजवंत तरुणी व महिला गुरफटल्या जात आहेत. 

हा व्यवसाय नजरेपलीकडेचा असल्याने पोलिसही याकडे कानाडोळा करीत असतात , नेमके पोलिसांच्या या भूमिकेमुळे देह व्यवसायाला चालना मिळत आहे. येथे हा प्रकार असाच सुरू राहील्यास लवकरच मुंबई पुणे सारख्या शहराच्या रांगेत येण्यास वेळ लागणार नाही करिता पोलीस प्रशासन व स्थानिक सामाजिक संघटनांनी तसेच सुदान नागरिकांनी याकडे लक्ष घालण्याची गरज आहे. 

या देह व्यवसाया संदर्भात शहरातील काही जागरूक नागरिकांतर्फे पोलीस स्टेशनला निवेदन सुद्धा देण्यात आले होते परंतू उलट त्यांच्याविरोधात उलट गुन्हा दाखल करण्यात आला होता हे विशेष. पोलिसांना कुठे काय सुरू आहे हे माहीत असूनसुद्धा कारवाही मात्र शून्य असल्याने देहव्यावसायला उधाण आले आहे एकीकडे गुन्हेगारी संदर्भात कंबर कसण्यासाठी डीसीपी पथक, स्पेशल स्कॉड आदी कार्यरत आहेत तरी सुद्धा यांच्या नजरे आड सुरू असलेले देहव्यावसाय पोलिसांना आव्हान देत आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com