महाल येथील श्रीमंत राजे रघुजी भोसले नगरभवनात शहरात पाय पसरत असलेल्या कोरोनासंदर्भातील उपाययोजनांचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज आढावा घेतला. यावेळी महापौर संदीप जोशी, खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार प्रा. अनिल सोले, गिरीश व्यास, नागो गाणार, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, मोहन मते, पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे, अतिरिक्त विभागीय आयुक्त अभिजित बांगर, उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती विजय झलके, सत्तापक्षनेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, "मेडिकल'चे अधिष्ठाता संजय मित्रा, "मेयो'चे डॉ. अजय केवलिया, "एम्स'च्या मेजर जनरल डॉ. विभा दत्ता, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, महापालिका उपायुक्त राम जोशी, पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर, माजी महापौर प्रवीण दटके आदी यावेळी उपस्थित होते.
नागपूर : संशयितांसह कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील प्रत्येकाची तपासणी करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिले. डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक 15 हजार सुरक्षा किट्स विविध संस्थांकडून उपलब्ध करून देण्यात येतील. याशिवाय शासनाच्या उपलब्ध निधीमधून सुरक्षा किट्स खरेदी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
अवश्य वाचा - CoronaVirus : उपराजधानीत कोरोनाचा पहिला बळी
महाल येथील श्रीमंत राजे रघुजी भोसले नगरभवनात शहरात पाय पसरत असलेल्या कोरोनासंदर्भातील उपाययोजनांचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज आढावा घेतला. यावेळी महापौर संदीप जोशी, खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार प्रा. अनिल सोले, गिरीश व्यास, नागो गाणार, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, मोहन मते, पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे, अतिरिक्त विभागीय आयुक्त अभिजित बांगर, उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती विजय झलके, सत्तापक्षनेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, "मेडिकल'चे अधिष्ठाता संजय मित्रा, "मेयो'चे डॉ. अजय केवलिया, "एम्स'च्या मेजर जनरल डॉ. विभा दत्ता, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, महापालिका उपायुक्त राम जोशी, पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर, माजी महापौर प्रवीण दटके आदी यावेळी उपस्थित होते.
कोरोना विषाणूमुळे बाधित रुग्णांच्या तपासणीसाठी मेयो आणि एम्स येथे उत्तम सुविधा असून मेडिकल व पशुवैद्यकीय महाविद्यालयात लवकरच ही सुविधा सुरू होत आहे. तपासणीसाठी पुरेशा प्रमाणात यंत्रसामग्री एक महिना पुरेल, असे नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना दिले. वैद्यकीय सामग्रीसाठी अडचण येत असल्यास तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्यास आवश्यक मंजुरी व निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
मेडिकल येथे ट्रॉमा केअरचा 220 बेड असलेला स्वतंत्र कोरोना वॉर्ड तयार करण्यात येत आहेत. मेयो व मेडिकल येथील व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, रुग्णवाहिकेच्या सुविधेसोबतच आयसीयु सुविधा असलेल्या शहरातील खासगी रुग्णालयांची सेवा घेण्याच्या दृष्टीने नियोजन करा, असे निर्देशही त्यांनी दिले.
लॉकडाउनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार तसेच साठेबाजी करून किमती वाढणार नाही, यावर लक्ष ठेवण्याची सूचना करीत त्यांना पोलिसांना अप्रत्यक्षपणे कारवाईचे संकेत दिले. जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या आहे. लॉकडाउनदरम्यान गर्दी टाळण्याचेही निर्देश त्यांनी दिले.
केंद्र व राज्य शासनाच्या नियमानुसार धान्य वितरणात येणाऱ्या अडचणी सोडविण्यात येतील, यासाठी जिल्हाधिकारी यांनी प्रस्ताव सादर करावा असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी लोकप्रतिनिधींनी धान्य वितरणासंदर्भात येणाऱ्या अडचणींची माहिती गडकरींना दिला. शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबांना धान्य वितरण करण्याची मागणी यावेळी लोकप्रतिनिधींनी केली.