आनंदवार्ता, भारताचा पर्यावरण निर्देशांक सुधारला, मिळाला हा क्रमांक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जून 2020

अमेरिका 24 क्रमांकावर, रशिया 58 क्रमांकावर तर चीन 120 क्रमांकावर आहे. पाकिस्तानने 166 क्रमांक घेऊन भारतापेक्षा दोन अंकांनी पुढे आहे. पहिल्या 10 देशात अनुक्रमे डेन्मार्क, लुक्‍झेमबर्ग, स्वित्झर्लंड, इंग्लंड, फ्रान्स, आष्ट्रीया, फिनलॅंड, स्वीडन, नॉर्वे आणि जर्मनीचा समावेश आहे. हे निर्देशांक देताना 11 समस्या आणि 32 निकषांवर 180 देशांना गुण देण्यात आले आहेत. दर दोन वर्षानी हा निर्देशांक काढण्यात येतो. 2018 मधील निर्देशांत भारताचा क्रमांक 177 होता. 

नागपूर :  अत्यंत काटेकोर पद्धतीने तयार होणाऱ्या जागतिक पर्यावरण निर्देशांकात भारताने 180 देशांमध्ये 168 क्रमांक मिळविला आहे. हा निर्देशांक येल सेंटर फॉर एनविरोनमेंट लॉ पॉलिसी या संस्थेने काढला आहे. त्यानुसार डेन्मार्कने सर्वाधिक 82.5 गुण घेऊन देशात प्रथम क्रमांक मिळविला तर भारत 27.6 गुण घेऊन 168 व्या क्रमांकावर तर 22.6 गुणांसह लिबेरीय हा देश शेवटी आला आहे. गत दोनवर्षीच्या तुलनेत यंदा भारताच्या निर्देशांकात सुधारणा झालेली आहे. 

अमेरिका 24 क्रमांकावर, रशिया 58 क्रमांकावर तर चीन 120 क्रमांकावर आहे. पाकिस्तानने 166 क्रमांक घेऊन भारतापेक्षा दोन अंकांनी पुढे आहे. पहिल्या 10 देशात अनुक्रमे डेन्मार्क, लुक्‍झेमबर्ग, स्वित्झर्लंड, इंग्लंड, फ्रान्स, आष्ट्रीया, फिनलॅंड, स्वीडन, नॉर्वे आणि जर्मनीचा समावेश आहे. हे निर्देशांक देताना 11 समस्या आणि 32 निकषांवर 180 देशांना गुण देण्यात आले आहेत. दर दोन वर्षानी हा निर्देशांक काढण्यात येतो. 2018 मधील निर्देशांत भारताचा क्रमांक 177 होता. 

हेही वाचा : अनलॉक, तरीही उद्योगांसमोर काळोखच, ही आहे कारणे...! 

या अहवालामध्ये कोविड 19 काळाचा समावेश केलेला नाही. काही शासकीय आणि काही खासगी संस्थेच्या आकडेवारीनुसार हा अहवाल तयार करण्यात आला आहे. हे निकष म्हणजे प्रामुख्याने पर्यावरण सद्यस्थिती आणि परिसंस्था संरक्षण हे आहे. याच सोबत हवा गुणवत्ता, पिण्याचे स्वच्छ पाणी, आरोग्य, कचरा प्रदूषण, हवामान बदल, पाण्याची संसाधने, मत्स्यव्यवसाय, परिसंस्था सेवा, जैवविविधता-अधिवास संरक्षण आदीच्या निकषानुसार निर्देशांक काढण्यात आला आहे, असे ग्रिन प्लॅनेट संस्थेचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Improvement in India's Environmental Index