वाघ, बिबट बघायचेय? चला गोरेवाड्याला! पर्यटकांसाठी ठरणार नवे आकर्षण

राजेश रामपूरकर
Monday, 25 January 2021

वन्यप्राणी या उद्यानात स्थलांतरित करण्यात आले आहेत. यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होणार आहेत. वन्यजीव संवर्धन, पुनर्वसनासह संशोधन व शिक्षण याबाबतही येथे लवकरच सुविधा निर्माण करण्यात येणार आहे.

नागपूर : वाघ, बिबट, अस्वल आणि तृणभक्षक प्राणी पाहायचे असेल तर आता ताडोबा, पेंच, बोर व्याघ्र प्रकल्पात जाण्याची गरज नाही. नागपूर शहरालगतच ‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान’ पर्यटकांसाठी नवे आकर्षण ठरणार आहे. या प्राणी उद्यानाचे उद्‍घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते २६ जानेवारीला होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक वासुदेवन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान हे नागपूर येथील महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या अखत्यारित आहे. उद्घाटनानंतर लगेच भारतीय सफारी नागरिकांसाठी खुली होणार आहे. ४० आसन क्षमतेची तीन विशेष वाहने व ऑनलाइन तिकीट बुकिंग सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

अधिक माहितीसाठी - वाढदिवसाला नातेवाईक बसले जेवायला; बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन

१९१४ हेक्टर वनक्षेत्रावर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणी उद्यान साकारले आहे. देशातील अशाप्रकारचे हे सर्वात मोठे प्राणी उद्यान असून, विदर्भातील पर्यटकांसाठी हे नवे पर्यटनस्थळ ठरणार आहे. प्राणी उद्यानात वाघ, अस्वल, बिबट आणि तृणभक्षी प्राणी सफारीचे काम पूर्ण झाले आहे.

वन्यप्राणी या उद्यानात स्थलांतरित करण्यात आले आहेत. यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होणार आहेत. वन्यजीव संवर्धन, पुनर्वसनासह संशोधन व शिक्षण याबाबतही येथे लवकरच सुविधा निर्माण करण्यात येणार आहे.

या प्रकल्पात उच्चदर्जाच्या पर्यटनसुविधांचे काम़ जलदगतीने सुरु आहे. पुढील टप्प्यात आफ्रिकन सफारीसाठी काम सुरु करण्याचे प्रस्तावित आहे. आगामी काळात येथे पक्ष्यांसाठी जागा राखीव ठेवण्यात येणार आहे. या जागेवर ‘बर्ड पार्क’ विकसित करण्याचे नियोजन आहे असे वासुदेवन यांनी सांगितले. यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) डॉ. रामबाबू, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.के. राव उपस्थित होते. 

जाणून घ्या - बापरे! वाळू तस्करांनी नायब तहसीलदारांच्या पोटावर चाकूने केले सपासप वार

इंडियन सफारीतील प्राणी 

प्राणी संख्या
वाघ २ (राजकुमार आणि वाघीण ली)
बिबट
अस्वल
निलगाय  १४
चितळ

 

  • प्रवेश शुल्क - वातानकूलित बेंझ बस - आयशर वातानुकूलित बस - साधी बस तृणभक्षक प्राणी (स्वागत दर म्हणून सध्या २० टक्के सूट) 
दर प्रत्यक्ष सूट प्रत्यक्ष सूट प्रत्यक्ष सूट
आठवड्यातील पाच दिवस ३०० २४० २०० १६० १०० १००
शनिवार आणि रविवार ४०० ३२० ३०० २४० १०० १००

सफारीच्या वेळा 

  • उन्हाळा - १५ मार्च ते १५ जून - ७.३० ते ११.३० वाजता 
  • दुपारी ३.३० ते ६.३० वाजता 
  • हिवाळा - १६ जून ते १४ मार्च ८.३०ते ५.३० वाजेपर्यंत

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inauguration of Balasaheb Thackeray Gorewada International Animal Park tomorrow