नागपुरात तापडीया समुहावर प्राप्तीकर विभागाचे छापे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

शहरातील नामांकित असलेल्या तापडीया समूहाने प्राप्तीकराची चोरी केल्याच्या कारणावरून प्राप्तीकर विभागाने आज सकाळीच तापडीया समूहावर छापेमारी केली. छापेमारी करण्यासाठी प्राप्तकर विभागाने 100 पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले आहे.

नागपूर : विदर्भ इंडस्ट्रिज असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि तापडीया समूहाचे संचालक यांच्या प्रतिष्ठाणावर आणि घरावर प्राप्तीकर विभागाने आज गुरूवारी अचानक छापेमारी केली. या छापेमारीमुळे व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली असून अनेकांचा या छाप्यांचा धसका घेतला आहे.

 

विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील नामांकित असलेल्या तापडीया समूहाने प्राप्तीकराची चोरी केल्याच्या कारणावरून प्राप्तीकर विभागाने आज सकाळीच तापडीया समूहावर छापेमारी केली. छापेमारी करण्यासाठी प्राप्तकर विभागाने 100 पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले आहे.

 

हे कसं शक्य आहे? - अरे देवा... पहिल्याला सोडले, दुसऱ्यासोबत "लिव्ह इन'मध्ये तरीही रात्री जायची तिसऱ्याकडे

प्रवीण तापडीया हे प्रतिष्ठाणाचे संचालक असून ते विदर्भ इंडस्ट्रिज असोसिएशनचे माजी अध्यक्ष आहेत. तापडीया यांच्या घरावरही प्राप्तीकर विभागाने छापे घातले असून काही महत्वपूर्ण कागदपत्रसुद्धा ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Income Tax Department raids on Tapadia group in Nagpur