आता काळ स्वदेशीचा, व्हॉट्‌सऍपला नव्हे तर करा "भारत मॅसेंजर'चा वापर...

राघवेंद्र टोकेकर
सोमवार, 1 जून 2020

कोरोनाच्या संकटात सापडलेल्या जगाने बघता बघता चीनच्या वस्तूंना बॉयकॉट करणे प्रारंभ केले आहे. याचाच एक भाग म्हणून नागरिकांनी मोबाईलमधील चीन बनावटीचे ऍपदेखील अनइन्स्टॉल करणे प्रारंभ केले आहे. विशेष म्हणजे याचा सर्वाधिक फटका बसला असेल तर तो टिकटॉकला. अनेकांनी टिकटॉक ऍपला बाहेरचा रस्ता दाखविला आहे. आता व्हॉट्‌सऍप मॅसेंजरलाही पर्याय उपलब्ध झाला असल्याने भारतीयांनी भारत मॅसेंजरला पसंती दिलेली आहे.

नागपूर : दहा वर्षांपूर्वी अमेरिकेत उदयाला आलेल्या व्हॉट्‌सऍपने जगभरात धमाल उडवून दिली. फार अल्प काळात या ऍपने प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये हक्‍काचे स्थान निर्माण केले. व्हॉट्‌सऍपने केवळ भारतीयांच्याच नव्हे तर जगातील लोकांच्या जीवनशैलीतही मोलाचे बदल घडविले. मात्र, आता काळ स्वदेशीचा आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या ग्रुपवर चर्चा रंगते आहे ती भारतीय बनावटीच्या भारत मॅसेंजरची.

कोरोनाच्या संकटात सापडलेल्या जगाने बघता बघता चीनच्या वस्तूंना बॉयकॉट करणे प्रारंभ केले आहे. याचाच एक भाग म्हणून नागरिकांनी मोबाईलमधील चीन बनावटीचे ऍपदेखील अनइन्स्टॉल करणे प्रारंभ केले आहे. विशेष म्हणजे याचा सर्वाधिक फटका बसला असेल तर तो टिकटॉकला. अनेकांनी टिकटॉक ऍपला बाहेरचा रस्ता दाखविला आहे. आता व्हॉट्‌सऍप मॅसेंजरलाही पर्याय उपलब्ध झाला असल्याने भारतीयांनी भारत मॅसेंजरला पसंती दिलेली आहे.

सोनम वांगचूक यांनी नुकतेच भारतीयांना चिनी प्रॉडक्‍स बॉयकॉट करण्याचे आवाहन केले होते. प्रत्येक युद्ध सीमेवर लढता येते असे समजू नका, तर देशातील सामान्य व्यक्‍तीलाही ते लढायचे आहे असे वांगचूक म्हणाले होते. व्हॉट्‌सऍपचा जन्म दक्षिण अमेरिकेत झाला असला तरी व्हॉट्‌सऍपच्या धर्तीवर भारत मॅसेंजरचा चाहतावर्गदेखील झपाट्याने वाढतो आहे. एका समुदायाने तर एक जूनला सर्वांनी भारत मॅसेंजर डाउनलोड करून घ्या असेदेखील आवाहन केले आहे.

पाहुणा वाराणसीत जन्माला आला

महागड्या मोबाईलमधील व्हॉट्‌सऍपची जागा घेणारा भारत मॅसेंजर नावाचा हा नवीन पाहुणा वाराणसीत जन्माला आलेला आहे. यात सोळा ते पन्नास एमबीपर्यंतचा व्हिडिओ पाठविता येणार आहे. वर्ड, एक्‍सेल व अडॉबच्या फाइल पाठविता येणार असून, ऍप वापरण्याची पद्धत व्हॉट्‌सऍप सारखीच आहे.

Video : कुटुंबापेक्षा गावाचे हित जपणाऱ्या या बापानेच पत्नी आणि मुलीला ठेवले संस्थात्मक विलगीकरणात

प्ले-स्टोअरवर उपलब्ध

भारत मॅसेंजर प्ले-स्टोअरवर उपलब्ध असून, तो डाउनलोड करण्यासाठी अवघी 51 एमबीची जागा लागते. आत्तापर्यंत हे ऍप एक लाखाहून अधिक युझर्सने डाउनलोड केलेले असून, व्हॉट्‌सऍप ग्रुपवर हा स्वदेशी भारत मॅसेंजर प्रत्येकाने डाउनलोड करावा असे आवाहन करण्यात येत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indigenous alternative to WhatsApp as India Messenger