तू मला आवडली, माझ्याशी शारीरिक संबंध ठेव म्हणत करायचा हा प्रकार...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 मार्च 2020

तो टोळीसह सपना हिच्या घरी गेला. 'तुमची मुलगी मला आवडली आहे, तिचे कुणाशीही लग्न करू नका.' अशी धमकी तिच्या आई-वडिलांना दिली.

नागपूर : अंबाझरीतील कुख्यात गुंडाने झोपडपट्टीत राहणाऱ्या 21 वर्षीय युवतीवर बलात्कार केला. या प्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सतीश ताराचंद चन्ने ( रा. पांढराबोडी) असे बलात्कार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुख्यात गुंड सतीश चन्ने याच्यावर आतापर्यंत डझनभर गुन्हे अंबाझरी पोलिस ठाण्यात दाखल आहेत. सतीशवर अवैधरीत्या दारू विक्री करणे, गुंडाची टोळी तयार करणे, खंडणी मागणे, दुकानदारांकडून हप्ता वसुली करणे तसेच सार्वजनिक ठिकाणी नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासारखे गुन्हे दाखल आहेत.  2017 ला जयनगर पांढराबोडी झोपडपट्टी वस्तीत राहणारी 21 वर्षीय युवती सपना (बदललेले नाव) हिच्यावर त्याची नजर पडली. 

तो टोळीसह सपना हिच्या घरी गेला. 'तुमची मुलगी मला आवडली आहे, तिचे कुणाशीही लग्न करू नका.' अशी धमकी तिच्या आई-वडिलांना दिली. तसेच सपना हिलाही कुण्या युवकाशी बोलताना दिसल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. सपना ही एका खाजगी कंपनीत नोकरी करते. गेल्या 2017 पासून सतीश हा तिच्यावर एकतर्फी प्रेम करीत होता. तसेच तिलाही प्रेम संबंध ठेवण्यासाठी धमकावत होता. त्याने तिला बळजबरीने जयनगरातील एका झोपडीत नेले. चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला आणि आणि पोलिसात तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. भेदरलेल्या सपनाने ही बाब कुणालाही न सांगता कुख्यात गुंड सतीश चन्ने याचा अत्याचार सहन केला. एका टोळीचा प्रमुख असलेल्या सतीशने याचा फायदा घेऊन सपना हिला वारंवार शारीरिक संबंध ठेवण्यास बाध्य केले. 

शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यास तो तिला तिच्या आई वडिलांसमोर जबरदस्त मारहाण करीत होता. सतीशच्या दहशतीमुळे कुणीही पोलीस तक्रार करीत नव्हते. सतीश ने तिला लग्न करण्याचे आमिष दाखवले आणि तिचा वारंवार शारीरिक उपभोग घेतला. शेवटी स्वपनाने ही बाब आपल्या एका मैत्रिणीला सांगितली. तिने सतीश विरुद्ध लढा देण्यासाठी हिंमत दिली. त्यामुळे सपनाने अंबाझरी पोलिस स्टेशनला येऊन सतीश विरुद्ध बलात्कार केल्याची तक्रार दिली. याप्रकरणी पीएसआय सोनवणे यांनी तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल केला. 

सतीचा पोलिसांवर हल्ला 
गुंड सतीश चन्ने याने गेल्या चार दिवसांपूर्वीच अंबाझरी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यावर हल्ला चढविला होता. याप्रकरणी पोलिसांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची तक्रार दाखल केली. याच गुन्ह्यात तो सध्या मध्यवर्ती कारागृहात आहे. त्याला बलात्काराच्या गुन्ह्यात मध्यवर्ती कारागृहातून अंबाझरी पोलीस ताब्यात घेण्यात येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Infamous gangster phisical relationship with girl