esakal | केंद्रीय पथकानं नागपुरातील कोरोना रुग्णांसाठीच्या सुविधांची केली पाहणी; बेड्सबाबत केल्या महत्वाच्या सूचना 
sakal

बोलून बातमी शोधा

केंद्रीय आरोग्य पथकाने मागील तीन दिवसात शहर व ग्रामीण भागातील कोविड सेंटर, लसीकरण केंद्र, आरटीपीसीआर तपासणी, गृहविलगीकरणाचा प्रोटोकॉल कंटेन्मेंट झोन,मेडिकल, मेयो तसेच ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड रुग्णांसाठी असलेल्या सुविधांची प्रत्यक्ष

केंद्रीय आरोग्य पथकाने मागील तीन दिवसात शहर व ग्रामीण भागातील कोविड सेंटर, लसीकरण केंद्र, आरटीपीसीआर तपासणी, गृहविलगीकरणाचा प्रोटोकॉल कंटेन्मेंट झोन,मेडिकल, मेयो तसेच ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड रुग्णांसाठी असलेल्या सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. 

केंद्रीय पथकानं नागपुरातील कोरोना रुग्णांसाठीच्या सुविधांची केली पाहणी; बेड्सबाबत केल्या महत्वाच्या सूचना 

sakal_logo
By
निलेश डोये

नागपूर : प्रशासनाकडून कोरोनाचे रुग्ण हाताळताना होत असलेल्या त्रुटींवर बोट ठेवत मायक्रो कंटेन्मेंट झोन तयार करा, आयसोलेशन बेडची संख्येत वाढवा, लसीकरणासाठी विशेष मोहीम राबविण्यात यावी, लसीकरण करताना लस वाया जाणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे, मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना अहवालात केल्या.

Success Story: हिरव्यागार शेतात वन्य प्राण्यांचा धुमाकूळ थांबणार; इंजिनियर्सनी बनवली...

कोरोना साथीच्या नियंत्रणासाठी प्रशासनातर्फे सध्या राबविण्यात येत असलेल्या व भविष्यात करावयाच्या उपाययोजना त्यासोबतच उपलब्ध वैद्यकीय सुविधा यासंदर्भात केंद्रीय आरोग्य पथकाने जिल्ह्यात मागील तीन दिवसात केलेल्या प्रत्यक्ष पाहणीवर आधारित अहवाल आज जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना सादर करण्यात आला.

केंद्रीय आरोग्य पथकाने मागील तीन दिवसात शहर व ग्रामीण भागातील कोविड सेंटर, लसीकरण केंद्र, आरटीपीसीआर तपासणी, गृहविलगीकरणाचा प्रोटोकॉल कंटेन्मेंट झोन,मेडिकल, मेयो तसेच ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड रुग्णांसाठी असलेल्या सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. 

दोन विद्यार्थिंनीवर बलात्कार; एक तीन महिन्यांची...

ज्या भागात मोठ्या प्रमाणात कोविड रुग्ण आढळून आले आहेत, अशा भागात मायक्रो कंटेन्मेंट झोन तयार करण्याला विशेष प्राधान्य देण्याची शिफारस केंद्रीय पथकाने केली आहे. कोविड महामारीचा सामना करताना मनुष्यबळाचे व्यवस्थापन करण्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे. जिल्ह्यात आयसोलेशन ६ हजार ५०६ तर २ हजार २६ आयसीयू बेड आहेत. या बेडसाठी आवश्यक असलेला ऑक्सिजनचा पुरवठा याबाबतही सूचना करण्यात आल्या आहेत. 

संपादन - अथर्व महांकाळ