esakal | Success Story: हिरव्यागार शेतात वन्य प्राण्यांचा धुमाकूळ थांबणार; इंजिनियर्सनी बनवली `इलेक्ट्रिक फेंसिंग' मशिन
sakal

बोलून बातमी शोधा

Engineers made safe Electric fencing machine in Nagpur

शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांचा त्यांना स्वतःला, कुटुंबाला, त्यांच्या पाळीव प्राण्यांना, पिकांना, फळझाडांना त्रास सोसावा लागतो.

Success Story: हिरव्यागार शेतात वन्य प्राण्यांचा धुमाकूळ थांबणार; इंजिनियर्सनी बनवली `इलेक्ट्रिक फेंसिंग' मशिन

sakal_logo
By
मंगेश गोमासे

नागपूर : शेतकरी म्हटलं की अनंत प्रश्न आणि हातात नसलेली उत्तरे देत निर्धाराने शेती व्यवसाय करणारा होय. पीक उत्पादनावर दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, अवेळी पाऊस,पावसातील मोठा खंड, कीड व रोगांचा प्रादुर्भाव, हवामानातील बदल, बाजार भावातील चढ उतार अशा असंख्य बाबींचा परिणाम होत असतो. 

शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांचा त्यांना स्वतःला, कुटुंबाला, त्यांच्या पाळीव प्राण्यांना, पिकांना, फळझाडांना त्रास सोसावा लागतो. अशा विपरीत परिस्थितीत वन्य प्राण्यांपासून होणाऱ्या हानीपासून मुक्तता मिळविण्यासाठी तीन अभियंत्यानी एकत्र येत स्टार्टअप सुरू केले आहे. `इलेक्ट्रिक फेंसिंग मशिन हे उत्पादन तयार करून शेतातील पिकांचे होणाऱ्या नुकसानीवर विराम लावण्याचा प्रयत्न केला आहे.

नागपूरच्या उपमहापौरांच्या फोनला आमदाराचाही नाही प्रतिसाद; नागनदी; स्वच्छता मोहिमेकडे...

नरखेड तालुक्यातील एका गावात रविवारी शेतीत काम करणाऱ्या दोन महिला मजुराचा शेताभोवती लावण्यात आलेल्या कुंपणाला असलेल्या इलेक्ट्रिक प्रवाहामुळे विजेचा धक्का बसल्याने मरण पावल्या. गेल्या काही वर्षात अनेक शेतात अशा घटना घडल्याची बाब समोर येत आहे. मात्र, हा उपाय न केल्यास जंगली डुकरे आणि इतर प्राणी शेतातील पीक फस्त करतात. त्यामुळे नाइलाजाने हाच उपाय शेतकऱ्यांना करावा लागतो. 

यावर उपाय म्हणून बीई मेकॅनिकल अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या अभिजित भोयर, इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन शाखेतील मयूर डफरे आणि मेकॅनिकल शाखेतील हर्षद वैद्य यांनी एकत्र येत `इलेक्ट्रिक फेंसिंग मशिन तयार केली. ही मशिन शेतीभोवती असलेल्या तारांना लावल्यास त्यातून प्राण्यांना केवळ झटका बसतो. या मशिनमध्ये बॅटरी असल्याने तारांना हात लागला तरी, केवळ झटका बसतो. मात्र, त्यामुळे कुठलीच जीवितहानी होत नाही. 

एरवी तारांना हात लागल्यास अर्थिंग नसल्याने तो तिथेच चिपकतो आणि जीवितहानी होते. याशिवाय प्राणीही केवळ झटक्यामुळे पळून जातात. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टळते. आज शेतकऱ्यांमध्ये या उत्पादनाला मागणी वाढली आहे.

धक्कादायक! नागपुरातील मनपा रुग्णालयांत व्हेंटिलेटरच नाहीत; शहरी आरोग्याची दैना;‘आयसीयू’ बेडचाही...

तीन वर्षांपूर्वी सुरू केले स्टार्टअप

अभिजित भोयर अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षाचा असताना, त्याच्या डोक्यात काहीतरी करावे असा विचार आला. त्यातून त्याने २०१८ साली ‘सेंसलिव्ह' नावाची कंपनी सुरू केली. या माध्यमातून त्याने आयटी सोल्यूशन देण्यास सुरुवात केली. या कामात त्याला इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन शाखेतील मयूर डफरे आणि मेकॅनिकल शाखेतील हर्षद वैद्य दोघांची साथ मिळाली. आज या कंपनीच्या माध्यमातून विविध उत्पादने ही तयार केली आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ