अभिनंदन! नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा, ‘गोत्‘ सिनेमाला आंतरराष्ट्रीय नामांकन

केवल जीवनतारे
Wednesday, 12 August 2020

या मराठी चित्रपटला ईको ब्रिक्स फिल्म फेस्टिवल मॉस्को आणि फर्स्ट टाईम फिल्म मेकर सेशन लंडन, दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा पुरस्कार अशी एकूण पाच नामांकने प्राप्त झाली आहेत.
या चित्रपटाचे पूर्ण छायाचित्रण नागपुर, छिंदवाडा येथे झाले. चित्रपटाला बेस्ट फिल्म ग्रामीण चित्रपट, बेस्ट लक्षवेधी फिल्म,बेस्ट डायरेक्टर शैलेंद्र कृष्णा बागडे, बेस्ट सिनेमाटोग्राफी हर्षद जाधव आणि बेस्ट कॉस्ट्यूमसाठी किरण बागडे असे एकूण पाच विभागात नामांकन प्राप्त झाले. आहे. नागपूरसाठी ही भुषणावह बाब आहे.

नागपूर : सिने दिग्दर्शक बनण्याचे स्वप्न त्याने उराशी बाळगले. कल्पकतेला जिद्द आणि चिकाटीचे बळ देत फोटोग्राफी करीत असलेल्या नागपुरातील एका युवकाने दिग्दर्शक बनण्याचा निश्चय केला. आणि सुरु केली वाटचाल त्या वाटेवर. नाटक, महानाट्य, शॉर्ट फिल्मचा पल्ला गाठत पूर्ण लांबीचे तीन चित्रपट तयार केले.

नुकताच त्याच्या आदिवासींच्या जीवनातील संघर्षावर चितारलेल्या ‘गोत्’ चित्रपटाला आंतरराष्ट्रीय नामांकन मिळालं आहे. त्या तरुण दिग्दर्शकाचे नाव शैलेंद्र कृष्णा बागडे.
मुळचा उत्तर नागपुरातील जरिपटका येथील. रंगमंचावरील चार भिंतीआडच्या एकांकिकांपासून तर खुल्या रंगमंचावरील महानाट्यांचे दिग्दर्शन सहजपणे पेलवल्यानंतर चित्रपटाच्या दिग्दर्शनाकडे निघालेला शैलेंद’ सिने दिग्दर्शनाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला.

उत्तर नागपुरातील गुरूनानक शाळेतून दहावी केले. पुढे मॉरिस कॉलेजमधून पदवी घेऊन तांत्रिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी नाट्यशास्त्रातील एम.एफ.ए. पदवी पूर्ण केली. ‘गोत्’ हा शैलेंद्रचा तिसरा पुर्ण लांबीचा चित्रपट. शाश्वत फिल्म निर्मित' गोत्’ चित्रपटाला लंडन येथील नामांकन मिळालं आहे.

या मराठी चित्रपटला ईको ब्रिक्स फिल्म फेस्टिवल मॉस्को आणि फर्स्ट टाईम फिल्म मेकर सेशन लंडन, दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा पुरस्कार अशी एकूण पाच नामांकने प्राप्त झाली आहेत.
या चित्रपटाचे पूर्ण छायाचित्रण नागपुर, छिंदवाडा येथे झाले. चित्रपटाला बेस्ट फिल्म ग्रामीण चित्रपट, बेस्ट लक्षवेधी फिल्म,बेस्ट डायरेक्टर शैलेंद्र कृष्णा बागडे, बेस्ट सिनेमाटोग्राफी हर्षद जाधव आणि बेस्ट कॉस्ट्यूमसाठी किरण बागडे असे एकूण पाच विभागात नामांकन प्राप्त झाले. आहे. नागपूरसाठी ही भुषणावह बाब आहे.

विदर्भातील निर्मिती असलेल्या मराठी सिनेमाची पाच नामांकनांसाठी निवड होणं ही आतापर्यंतच्या इतिहासातील पहिलीच वेळ. मुंबईत हा सोहळा होईल.

यापुर्वी शैलेंद्नच्या ‘तारा’ द लॉक या शॉर्ट फिल्मला आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. प्रसिद्ध अभिनेते उपेंद्र लिमये , किशोर कदम , मिलिंद गुणाजी , सुशांत शेलार यांना घेऊन ' रेला रे 'तयार केला होता. यानंतर ‘त्रिश्ना’ हा चित्रपट बनवला. ‘गोत्’ तिसरा सिनेमा. या तीन चित्रपटांसह आक्रोश, सलवार, तारा (द लॉक) या शार्ट फिल्मस्, सत्यांश, पलक, फनकार, है दम, वा भई वा या मालिका केल्या. ‘महासूर्य’ , ‘तथागत’, डॉ . भीमराव महानाट्याचे दिग्दर्शन शैलेंद्रने केले आहे .

सिनेसृष्टीत पाय रोवत असताना शैलेंद्रने एकांकिकांची कास सोडली नाही. समांशी, अग्रगामीनी, घोटुळ, महेंद्र सुके लिखित कु. सौ. कांबळे, गिरिश कर्नाड यांच्या हयवदनचे प्रयोग केले. अनेक पारितोषिक मिळाले. क्षितिज जोग, मिलिंद गुणाजी, उपेंद्र लिमये अशा दिग्गज कलावंतासंह सुखविंदरसिंग, वैशाली सामंत , उदीत नारायण, रविंद्र साठे, बेला शेंडे या गायकांसोबत त्यांनी काम केले. ‘गोत्’ चित्रपटाच्या यशाचे श्रेय त्यांनी चळवळीला दिले आहे. नागपुरात चित्रनगरीच्या कार्याला गती मिळावी. ही इच्छा शैलेंद्नने व्यक्त केली. यातून विदर्भात नवीन अभिनयाच्या तसेच रोजगाराच्या संधी तयार होतील. दिग्दर्शक म्हणून तरुण पिढीचे भावविश्‍व मांडणाऱ्या शैलेंद्रच्या भविष्यातील यशासाठी शुभेच्छा.

सविस्तर वाचा - नवी उमेद! आठ तालुक्‍यातील ३२० गावांत होणार विषमुक्त भाजीपाल्याचे उत्पादन

‘गोत्’ची कथा
गोत्’ सिनेमाची कथा अदिवासी भागातील आहे. अंधश्रद्धा, रुढी परंपरेच्या विळख्यातील निपुत्रिक दाम्पत्य ‘हरबी’ आणि ‘कचरू’ यांच्या आयुष्यातील खेळ मांडणारी कथा आहे. नवऱ्याच्या कुळातील एकट्या पडलेल्या अपशकुनीला घरी आसरा दिल्याने संकटाला सुरूवात झाली. संकटांचा सामना करणारा वेगळ्या धाटणीचा हा सिनेमा आहे. सिनेमाचे चित्रण छिंदवाडाजवळच्या चोरेपठार आणि मुंगनापार, नागपुरात झाले. निर्मिती किरण बागडे यांची आहे. कथा , पटकथा आणि दिग्दर्शन शैलेंद्र कृ ष्णा यांचे आहे. कॅमेरा हर्षज जाधव यांनी हाताळला. बाहुबली सिनेमाचे मेकअपमॅन प्रताप बोराडे यांनी ‘ गोत्’ चित्रपटात रंगभूषेची बाजू सांभाळली आहे. भूपश सवाई यांचे संगीत आहे. समीर शेख यांनी एडिटिंग केले. मुख्य भूमिकेत किरण बागडे , पुजा पिंपळकर सचिन , गीरी , सारनाथ रामटेके , मिक्की रामटेके , विजय रामटेके आणि मिलींद रामटेके आहेत .

संकटावर मात करीत आहे
पत्नी किरणच्या साथीने आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करीत आहे. ती कलावंत आहे. शॉर्ट फिल्मपासून तर रेला रे, गोत् अशा सर्वच सिनेमात अभिनयासह लेखनकार्यात साथ मिळत आहे. टिमच्या सहकार्यातूनच आंतरराष्र्टीय महोत्सवापर्यंतची मजल गाठता आली.
शैलेंद्र कृष्णा
सिने दिग्दर्शक.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: International nomination to film Got of Nagpur