नागपूर जिल्ह्यातही वाढेल  मानव- वन्यजीव संघर्ष 

राजेश रामपूरकर
Friday, 9 October 2020

वन्यजिवांनी मानवावर केलेल्या हल्ल्याच्या घटना कुढे घडल्या त्या डाटाचा अभ्यास करणे गरजेचे आहे. मानव वन्यजीव संघर्ष वाढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे योजनेत काय त्रुटी आहेत. त्याचाही अभ्यास करावा लागणार आहे.

नागपूर :  नागझिरा, उमरेड-कऱ्हाडला, बोर व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात प्रजनन करणाऱ्या वाघिणींची संख्या वाढताना दिसत आहे. ही गती पाहता पुढील दोन ते तीन वर्षात नागपूर, वर्धा आणि भंडारा जिल्ह्यातही मानव- वन्यजीव संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. याबाबत आताच योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे, असे मत मुख्य वनसंरक्षक डॉ. कल्याणकुमार यांनी आज येथे व्यक्त केले. 

वन्यजीव सप्ताहाच्या समारोपप्रसंगी वेबिनारच्या माध्यमातून ‘मानव-वन्यजीव संघर्ष - प्रश्न- उपाययोजना‘ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. यात प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये, बिट्टु सहगल, सेवानिवृत्त वनाधिकारी विश्वास सावरकर, राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य बंडू धोत्रे, कुंदन हाते, यादव तरटे पाटील, सेवानिवृत्त उपवनसंरक्षक संजय ठवरे, भारतीय वन्यजीव संस्थानचे शास्त्रज्ञ डॉ. बिलाल हबीब, देबी गोयंका, सेवानिवृत्त वनाधिकारी गिरीश वशिष्ठ, स्वप्निल सोनोने, सेवानिवृत्त वनाधिकारी किशोर मिश्रीकोटकर उपस्थित होते. 

तो ड्युटीसाठी दररोज चालतो २२ किमी पायी!

डॉ. बिलाल हबिब म्हणाले, वन्यजिवांनी मानवावर केलेल्या हल्ल्याच्या घटना कुढे घडल्या त्या डाटाचा अभ्यास करणे गरजेचे आहे. मानव वन्यजीव संघर्ष वाढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे योजनेत काय त्रुटी आहेत. त्याचाही अभ्यास करावा लागणार आहे. गिरीश वरिष्ठ म्हणाले, क्षेत्रिय वनाधिकारी, कर्मचाऱ्यांनी वन्यजिवांचे अस्तित्व असलेल्या गावातील नागरिकांसोबत कायम संपर्कात राहणे गरजेचे आहे. संचालन डॉ. रविकिरण गोवेकर यांनी केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: It Will be Increase in Nagpur District Human-Wildlife Conflict