‘सालई, माहुली’ला जलसमाधी, नयाकुंड मात्र जुना असूनही साबूत, काय भानगड आहे, वाचा...

रूपेश खंडारे
Wednesday, 2 September 2020

अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट प्रवृत्तीमुळे दोन वर्षीतच पुलाचे ‘बारा वाजले’. कालपरवा आलेल्या पुराच्या पाण्यात या पूलाला जलसमाधी मिळाली. त्यामुळे या पुलाच्या बांधकामात कितीतरी भ्रष्ट लोकांनी स्वतःचे हात ओले करून घेतले असल्याने हा पूल नदीच्या पुरात वाहून गेला आणि येथील ३० गावांचा संपर्क मात्र तुटला.
 

पारशिवनी (जि.नागपूर) :  सालई, माहुली काही गावांची नावे नाहीत किंवा कुठल्या प्रकल्पाचेही नाही. अहो, ‘पेंच’ नदीवरील हे पूल आहेत राव! तालुक्यातील ग्रामीण भागांना जोडणारा अती महत्वाच्या दुवा म्हणजे हे पूल होते बरं का ! पण अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट प्रवृत्तीमुळे दोन वर्षीतच पुलाचे ‘बारा वाजले’. कालपरवा आलेल्या पुराच्या पाण्यात या पूलाला जलसमाधी मिळाली. त्यामुळे या पुलाच्या बांधकामात कितीतरी भ्रष्ट लोकांनी स्वतःचे हात ओले करून घेतले असल्याने हा पूल नदीच्या पुरात वाहून गेला आणि येथील ३० गावांचा संपर्क मात्र तुटला.

अधिक वाचाः कोळसा ट्रक उलटून चालकाचा मृत्यू, आता वेकोलि प्रशासनावर होताहेत हे आरोप…
 

१२.२० कोटी रुपये आला खर्च
१जानेवारी२०१४ ला या पुलाच्या बांधकामाचे भूमीपुजन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या  हस्ते झाले. तेव्हाही आजी-माजी आमदारांत स्वागतावरून चांगलीच जुंपली होती. तो क्षण आजही तालुकावासींच्या आठवणीत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग विशेष प्रकल्प  निधी अंतर्गत१२.२० कोटी रुपये या बांधकामावर खर्च करण्यात आले. बांधकाम करतेवेळी बांधकाम निकृष्ठ होत असल्याने स्थानिकांनी वेळोवेळी बांधकाम विभागाकडे तक्रारी सादर केल्या. पण इतरांना येथे ‘हात ओले’ करायचे होते. म्हणूण या बांधकामाच्या तक्रारीकडे कुणीही लक्ष दिले नाही. दोन वर्षे विलंबाने पुलाचे बांधकाम येथील कंत्राटदार अजयपाल मंगल ( ठाणे मुबंई) यांनी केले. त्यांनी हा पूल ३० जुन२०१८ पूर्ण केला. तत्कालीन भाजप आमदार मल्लीकार्जून रेड्डी यांनी या पुलाचे लोकार्पण करुन रहदारीकरीता पूल खुला करुन दिला. पण हा पूल केवळ दोन वर्षही पाण्याच्या मारा सहन करु शकला नाही, नी पुराच्या पाण्यात रविवारी पुलाला जलसमाधी मिळाली. बांधकाम कंत्राटदार, अधिकारी
नागरिकांनी पुलाच्या बांधकामाच्या तक्रारी केल्या होत्या. वेळीच कुणीही लक्ष दिले नसल्याने आज हा पूल पाण्यात कोसळला, असा थेट आरोप येथील नागरिकांनी प्रसारमाध्यामांसमोर केला.

अधिक वाचाः महिला, बालकल्याण विभागात बदल्यांचा घोळ, काय आहे प्रकरण वाचा सविस्तर

चौकशी केल्यावर समोर येईल स्थिती
जुन्या काळातील नयाकुंड पूल आजही पाण्याचा मारा सहन करीत उभा आहे. नदीला कितीतरी पूर आले, तरी तो डगमगला नाही. दररोज हजारो वाहनांची वर्दळ, लांबलचक अंतर असूनदेखील या पुराच्या पाण्यात वाहून गेला नाही. सालई, माहुली पेंच नदीवरील पूल अल्पावधित जलसमाधी घेतो म्हणजे काय? पुलाच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करुन हा पूल उभा केला गेला असावा, हे चौकशी केल्यावर समोर येऊ शकते. त्यासाठी या पुलाच्या बांधकामाची निःपक्ष चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

संपादन  : विजयकुमार राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jalasamadhi to ‘Salai, Mahuli’, Nayakund but old though Sabut