जरीपटका कॉलगर्ल्स आणि दलालांसाठी सेफ झोन!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत सेक्‍स रॅकेटला ऊत आला आहे. कॉलगर्ल्स आणि दलालांसाठी "सेफ झोन' म्हणून सध्या जरीपटका परिसर आहे. पोलिसांनी पीडित महिलेची सुटका करून दोघींना अटक केली. दोघींविरुद्ध जरीपटका पोलिस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

नागपूर : जरीपटक्‍यातील सुगतनगर भागात सुरू असलेल्या सेक्‍स रॅकेटवर छापा टाकून पोलिसांनी दोन महिलांना अटक केली. देहव्यापार करवून घेतल्या जाणाऱ्या विवाहित महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. विणू देवराव धमगाये (रा. सुगतनगर) व शारदा दयानंद सरोदे (रा. इंदोरा मठ मोहल्ला) अशी अटकेतील महिला दलालांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत सेक्‍स रॅकेटला ऊत आला आहे. कॉलगर्ल्स आणि दलालांसाठी "सेफ झोन' म्हणून सध्या जरीपटका परिसर आहे. सुगतनगरात एका घरात दोन महिला सेक्‍स रॅकेट चालवीत असल्याची माहिती पोलिस उपायुक्‍त निलोत्पल यांना मिळाली. त्यांनी विशेष पथकाचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, पोलिस शिपाई विनोद सोनटक्‍के, मृदुल नगरे यांना छापा घालण्याचे आदेश दिले.

सविस्तर वाचा - सायबर फिशिंग : जामताऱ्याच्या हिटलिस्टवर "महाराष्ट्र'

विशेष पथकाने जरीपटका पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस शाइन खान, वैशाली कैकाडे यांच्या मदतीने सुगतनगरातील सेक्‍स रॅकेटवर छापा टाकला. पोलिसांनी पीडित महिलेची सुटका करून दोघींना अटक केली. दोघींविरुद्ध जरीपटका पोलिस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही महिला दलाल या अन्य काही तरुणींकडूनही देहव्यापार करवून घेत होत्या. त्यांनी अनेक आंबटशौकिनांना हॉटेल, लॉज आणि फार्महाउसवर तरुणी पुरविल्या आहेत. त्यामुळे दोन्ही महिलांची कसून चौकशी करण्यात येत आहे.

जरीपटका पोलिसांच्या भूमिकेवर संशय
जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत काही पोलिस कर्मचाऱ्यांचे सेक्‍स रॅकेट चालविणाऱ्या दलालासोबत "अर्थपूर्ण' संबंध असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच जरीपटक्‍यात सेक्‍स रॅकेट मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागालासुद्धा आहे. मात्र, एसएसबीने एकदाही कारवाई केली नाही. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर संशय निर्माण झाला आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Is Jaripataka in Nagpur safe zone for broker & callgirls