राष्ट्रवादीच्या ट्विटने खळबळ; काँग्रेसवरच घेतला अन्याय होत असल्याचा संशय

Jayant Patil asked that the question was unfair to his workers Nagpur political news
Jayant Patil asked that the question was unfair to his workers Nagpur political news

नागपूर : महाविकासआघाडी सरकारमधील सहभागी पक्षांच्या नेत्यांच्या कुरबुरी अधूनमधून बाहेर येतच असतात. आता आमदारांकडून ‘आपल्या कार्यकर्त्यांवर अन्याय तर होत नाही ना’, याचा आढावा घेण्यासाठी बैठक असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. तसे ट्विटही राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून करण्यात आले. आता जयंत पाटलांच्या वक्तव्यामुळे नवीन वाद निर्माण होतो की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरीतून राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेची सुरुवात केली. यात्रेच्या पाचव्या दिवशी शेवटची बैठक त्यांनी नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील खापरखेडा येथे घेतली. येथे आमदार कॉंग्रेसचे आहेत.

आमदार तुम्हाला सोबत घेऊन काम करतात की नाही, आपल्या कार्यकर्त्यांवर अन्याय तर होत नाही, अशी विचारणा त्यांनी कार्यकर्त्यांना केली. जयंत पाटलांच्या प्रश्‍नाला उत्तर देताना कार्यकर्ते भरभरून बोलले. त्याहीपेक्षा जास्त चर्चा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अधिकृत ट्विटची रंगली आहे.

महाविकासआघाडीतील मित्रपक्ष असलेले कॉंग्रेसचे नेते व राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनी केदार सावनेर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. सावनेर नगर परिषदेवर सध्या भाजप आणि रासपची सत्ता आहे. अध्यक्ष भाजपच्या रेखा मोहाडे, तर उपाध्यक्ष रासपचे अरविंद लोधी आहेत.

पुढील वर्षी नगर परिषदेची निवडणूक आहे. नगर परिषदेवर कॉंग्रेसची एकहाती सत्ता असावी, यासाठी स्थानिक आमदार आतापासून जोर लावून आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख उपाध्यक्ष अरविंद लोधी यांच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येते.

राष्ट्रवादी खाते उघडण्याच्या मनःस्थितीत

राष्ट्रवादी कॉंग्रेस येथे खाते उघडण्याच्या मनःस्थितीत असल्याचे दिसत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीपासून वाघोडा रस्ता गेला आहे. त्याबाबत पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार समाधानी नसल्याची माहिती आहे. नवीन डीपी प्लान तयार करण्याची तयारी त्यांनी चालविली आहे. त्यासाठी नगरपरिषदेवर सत्ता बळकावण्यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस दोन्ही पक्षांचे नेते सरसावले आहेत.

यांची होती कार्यक्रमाला उपस्थिती

खापरखेडा येथे झालेल्या बैठकीला माजी मंत्री रमेश बंग, माजी आमदार राजेंद्र जैन, माजी आमदार प्रकाश गजभिये, नागपूर जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख, विदर्भ दौरा समन्वयक प्रवीण कुंटे पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, राजेंद्र बढिये आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीचे आयोजन राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अमर जैन, सावनेर विधानसभा अध्यक्ष किशोर चौधरी, अफसर खान, कपिल वानखेडे, रामू बैतुले, जितेंद्र पानतावने, विनोद गोडबोले, देवानंद मगरे, विनोद कोथरे यांनी केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com