कोणी नोकरी देता का नोकरी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 जानेवारी 2020

आरक्षित वर्गातून शासकीय सेवा मिळविणाऱ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागते. अनुसूचित जमाती वर्गातून सेवा मिळविणारे अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने जात वैधता प्रमाणपत्र नसलेले अधिकारी, कर्मचारी यांना सेवेतून कमी करण्याबाबतचा आदेश दिला.

नागपूर : अनुसूचित जमाती वर्गातून नोकरी मिळविणारे व जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती अधिसंख्य पदावर करून त्यांना 11 महिन्यांच्या सेवेवर घेतले आहे. या अधिकारी,कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्‍न अद्याप कायम आहे. दुसरीकडे रिक्त झालेल्या जागेवर पदभरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नागपूर जिल्हा परिषदेमध्ये 168 जागेवर पदभरती करण्यात येणार आहे. शिक्षण विभागातील 155 तर आरोग्य विभागातील दोन जागांकरता 1900 पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहे. यात आणखी भर पडणार असल्याचे बोलल्या जात आहे.

सविस्तर वाचा - पुजा मिथुन जोडीला नागपुरात रंगेहात अटक, कोण आहे ही जोडी?

आरक्षित वर्गातून शासकीय सेवा मिळविणाऱ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागते. अनुसूचित जमाती वर्गातून सेवा मिळविणारे अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने जात वैधता प्रमाणपत्र नसलेले अधिकारी, कर्मचारी यांना सेवेतून कमी करण्याबाबतचा आदेश दिला. या आदेशावर राज्य शासनाने अमल करताना कर्मचाऱ्यांची सेवा सरसकट बंद न करता त्यांना 11 महिन्यांकरिता सेवेत घेण्याचा निर्णय घेतला. जिल्हा परिषदेत 168 कर्मचारी जात वैधता प्रमाणपत्र सादर करू शकले नाही. यात सर्वाधिक संख्या शिक्षकांची आहे. या कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आले आहे. 11 महिने किंवा सेनानिवृत्तीचा कालावधी यापैकी जे आधी घडेल, तोपर्यंत सेवा असणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जमातीच्या वर्गातील रिक्त पदांची भरती करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नागपूर जिल्हा परिषदेने 168 पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. जिल्हा परिषदेत 155 सहायक शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी गेल्या तीन दिवसात 1500 अर्ज आले आहे. टीईटी अथवा सीटीईटी मध्ये गुणवत्ता ग्राह्य धरण्यात येणार आहे. सोबतच जात वैधता प्रमाणपत्र उमेदवारांना द्यायचे आहे. तर आरोग्य विभागात दोन पदांसाठी 400 वर अर्ज आले आहेत. आरोग्य विभाग पदभरतीसाठी परीक्षा घेणार आहे.  

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jobs are in hundred & applications are in thousand