पुजा मिथुन जोडीला नागपुरात रंगेहात अटक, कोण आहे ही जोडी?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 जानेवारी 2020

मुलींसाठी ग्राहकांना वेगळे पैसे द्यावे लागत असत. स्पामध्ये येणाऱ्या ग्राहकांनी पोलिसांना माहिती देऊ नये किंवा मोबाईलने शारीरिक संबंधाचे शुटिंग करू नये म्हणून काऊंटरवर त्यांचे मोबाईल जमा करून ते स्विच ऑफ करण्यात येत होते. त्यानंतर त्यांना आतमध्ये प्रवेश देण्यात येत होता.

नागपूर : प्रतापनगरातील एका इमारतीच्या गाळ्यात "झिडोस स्पा अँड ब्युटी पार्लर'मध्ये सुरू असलेल्या सेक्‍स रॅकेटवर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा घातला. या छाप्यात तीन तरूणींना देहव्यापार करताना ताब्यात घेण्यात आले. पूजा-मिथून ही जोडी ब्युटी पार्लरमध्ये येणाऱ्या ग्राहकांना मुली पुरवत होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिमूर्ती रोडवरील द्रोणाचार्यनगरातील मुस्कान वर्षा अपार्टमेंटमधील एफ 3 या गाळ्यात झिडोस स्पा अँड ब्युटी पार्लर युनिसेक्‍स सलून सुरू होते. या सलूनचे संचालक पूजा रतन नागदेवे (वय 27, रा. सुभाषनगर, कामगार कॉलनी) आणि मिथून भीमराव सरोदे (30, तकीया वार्ड, भंडारा) हे आहेत. पूजा-मिथून ही जोडी देहव्यापारात मोठे दलाल म्हणून ओळखल्या जातात. गेल्या काही महिन्यांपासून ही जोडी ब्युटी पार्लरमध्ये ग्राहकांना तरूणी पुरवित होते. त्यासाठी मोठी रक्‍कम उकळण्यात येत होती. या प्रकारामुळे ब्युटी पार्लरमध्ये आंबटशौकीनांची मोठी गर्दी राहत होती. मात्र, येथे ओळखीच्याच ग्राहकांना एंट्री मिळत होती. पोलिसांच्या हाती सापडू नये म्हणून पूजा आणि मिथून हे विशेष लक्ष ठेवून होते.
कुंटनखान्यात येणाऱ्या ग्राहकांकडून सुरुवातीला काऊंटरवर 1800 रुपये जमा करण्यात येत होते. त्यानंतर त्यांना मुली पुरविण्यात येत असत.

सविस्तर वाचा - 24 जानेवारीला न चुकता उपस्थित राहा, न्यायालयाचे देवेन्द्र फडणवीसांना आदेश

मुलींसाठी ग्राहकांना वेगळे पैसे द्यावे लागत असत. स्पामध्ये येणाऱ्या ग्राहकांनी पोलिसांना माहिती देऊ नये किंवा मोबाईलने शारीरिक संबंधाचे शुटिंग करू नये म्हणून काऊंटरवर त्यांचे मोबाईल जमा करून ते स्विच ऑफ करण्यात येत होते. त्यानंतर त्यांना आतमध्ये प्रवेश देण्यात येत होता. ही माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्‍त गजानन राजमाने यांच्या पथकाला मिळाली. गेल्या 15 दिवसांपासून पोलिस या स्पाच्या मागावर होते. त्यासाठी पोलिसांनी आपल्या पंटरला या स्पामध्ये पाठविले. पंटर तीन ते चारदा या स्पामध्ये जाऊन आला. पंटर हा आंबटशौकीन ग्राहक असल्याची खात्री पूजाला झाली होती. नेहमीप्रमाणेच शुक्रवारी सायंकाळी 7 च्या सुमारास पंटर या स्पामध्ये गेला. त्यावेळी पोलिस पथक स्पाजवळ दबा धरून बसले होते. आतमध्ये जाण्यापूर्वी पंटरने पोलिसांना इशारा केला होता. पोलिसांना इशारा मिळताच पोलिस पायीच या स्पामध्ये गेले आणि धाड घातली. त्यावेळी पंटर हा एका तरुणीसोबत एका खोलीत होता. याप्रकरणी प्रतापनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून पूजा आणि मिथुन यांना अटक करययात आली. पोलिसांच्या हाती सापडलेल्या तीनही पीडित तरुणी या सामान्य कुटुंबातील असल्याची माहिती आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त नीलेश भरणे, उपायुक्त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय किशोर पर्वते, पीएसआय स्मिता सोनवणे, अतुल इंगोले, हवालदार संजय पांडे, मनोजसिंह चौहान, शिपाई प्रफुल्ल बोंद्रे, अमित त्रिपाठी, महिला शिपाई छाया राऊत, साधना चव्हाण, दीपिका दोनोडे, सीमा बघेले यांनी केली.

रांगेत उभ्या राहायच्या मुली

ग्राहक स्पामध्ये आल्यानंतर त्याच्याकडून पूजा पैसे जमा करून घ्यायची. त्यानंतर स्पामधील छुप्या रूममधून तरूणी बाहेर येत होत्या. तरूणींपैकी ग्राहकाला "चॉईस' करण्यास सांगण्यात येत होते. तरूणीची निवड केल्यानंतर त्यांना रूम उपलब्ध करून देण्यात येत होता.

यापूर्वी फसला होता "ट्रॅप'

यापूर्वी पोलिसांनी तीन ते चारदा या स्पावर छापा घातला होता. परंतु, प्रत्येकवेळी पोलिसांचा ट्रॅप फसत होता. त्यामुळे पोलिसांना रिकाम्या हाताने परत जावे लागत असे. विभागात कार्यरत असलेला एक माजी कर्मचारी पूजाला सापळ्याची टिप देत असल्याचा संशय आहे.

प्रतापनगर पोलिसांचा आशिर्वाद ?
मिथून याचा भंडाऱ्याला बीअर बार आहे. त्यामुळे मिथून नागपुरातून काही तरूणींना भंडाऱ्यातील बारमध्ये नेत होता. तसेच त्याचे प्रतापनगरातील काही पोलिस कर्मचाऱ्यांची "अर्थपूर्ण' संबंध असल्याची चर्चा पोलिस दलात आहे. त्यामुळे पूजा-मिथूनचे सेक्‍स रॅकेट धूमधडाक्‍यात सुरू होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पुजा मिथुन जोडीला नागपुरात रंगेहात अटक, कोण आहे ही जोडी?

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sex racket in beauty parlour run by Puja & mithun