दारुडा मुलागा ठरू लागला कर्दनकाळ आईवडिलांनी केला त्याचा खेळ खल्लास

जगदिश सांगोले
Sunday, 1 November 2020

सायंकाळी नऊच्या सुमारास अतुल हा नेहमीप्रमाणे दारू पिऊन आला. जेवणावरून आईशी तो भाडंण करू लागला. तेव्हा त्याच्या वडिलांनी तू घरी पैसे देत नाही. कामधंदा करीत नाही. जे आहे ते खा, असे म्हटल्यावर त्याने आईला शिवागीळ केली व बापाच्या हातावर पावशी फेकून मारली. वडिलांच्या मनगटावर धारदार पावशी लागली.

रामटेक (जि.नागपूर) : आईवडींलांसाठी मुलगा म्हातारणची काठी असतो, जगण्याचा आधार असतो. त्याच्या वंशाचा दिवा असतो. मुलासाठीही आईवडील हे देवाप्रमाणे पुज्य असतात. परंतू एखादा मुलगा आईवडीलांसाठी कर्दनकाळ ठरत असेल तर? असहाय आईवडीलांनी काय करावे? परंतू रामटेक तालुक्यातील हिवराहिवरी गावातील रहिवासी असलेल्या मातापित्यांनी मुलगा व्यसनाच्या आहारी जाऊन त्यांच्या जिवावर उठल्यामुळे आईवडील या पुत्रालाच संपवून टाकले. मुलगा दारू पिऊन आल्यानंतर वारंवार आईवडीलांना शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या मुलाला आईवडीलांनी त्रस्त होऊन नशेत असतानाच त्याचा गळा आवरून ठार केल्याची घटना रामटेक तालुक्यातील हिवराहिवरी येथे घडली. घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

अधिक वाचाः अचानक का गुदमरतोय श्‍वास? उमरेडकरांना आता नकोसे झाले वायुप्रदूषण !
 

जेवणावरून आईशी भाडंण करू लागला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अतुल उद्धव चौधरी (वय २२, हिवराहिवरी) हा आपल्या आईवडील आरोपी उद्धव तुळशीराम चौधरी (वय ४२) माया उद्धव चौधरी ( दोघेही रा.हिवराहिवरी)  यांच्यासोबत गावात राहत होता. अतुलला दारू पिण्याचे व्यसन होते. दारु पिऊन आल्यानंतर  घरी आईवडीलांनातो शिवीगाळ करीत होता. शनिवारी (ता.३०) सायंकाळी नऊच्या सुमारास अतुल हा नेहमीप्रमाणे दारू पिऊन आला. जेवणावरून आईशी तो भाडंण करू लागला. तेव्हा त्याच्या वडिलांनी तू घरी पैसे देत नाही. कामधंदा करीत नाही. जे आहे ते खा, असे म्हटल्यावर त्याने आईला शिवागीळ केली व बापाच्या हातावर पावशी फेकून मारली. वडिलांच्या मनगटावर धारदार पावशी लागली. आई वडिलांना त्याने बुक्क्यांनी मारणे सुरू केले. दोघांना मारून टाकतो, असे म्हणून त्याने दोघांनाही अश्लील शिवीगाळ केली. तेव्हा अतुलच्या आईने त्याचे पाय पकडले व बापाने त्याच्या छातीवर बसून दोरीने गळा आवळून त्याला ठार केले.

अधिक वाचाः मनेका गांधींच्या फोनवरून टळला दोन बोकडांचा बळी
 

पोलिसांना आला संशय
सकाळी गावातील पोलिस पाटील रमेश विनायक नाटकर यांनी रामटेक पोलिसांना माहिती दिली असता ते लगेच घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा केला व पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांची चौकशी करण्यात आली. पोलिसांना संशय आला. त्यांची सखोल विचारपूस केली असता आरोपींनी अखेर आम्हीच आपल्या मुलाला ठार केले असे कबूल केले. फिर्यादी पोलिस पाटील यांच्या तक्रारीवरून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा तपास पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधीक्षक राहुल माखनीकर, उपविभागीय पोलिस अधिकारी नयन आलूरकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक दिलीप ठाकूर, पोलिस उपनिरीक्षक शेन्डगे, एपीआय भुते, बारंगे, पीएसआय कोळेकर, एएसआय काळे, गोविंद खांडेकर, साबीर शेख करीत आहेत .

संपादनःविजयकुमार राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kardankal became a drunken boy, his parents also played his game