हम होंगे कामयाब! "या' विद्यापीठाने कोरोनाशी लढण्यासाठी उचलले असे पाऊल!

Kalidas Sanskrit University
Kalidas Sanskrit University

नागपूर : संपूर्ण जगाभोवती मृत्यूचे वलय निर्माण करणाऱ्या महाभयंकर अशा "कोविद-19' या विषाणूला प्रतिबंध घालण्याबाबत नागरिकांचे समुपदेशन करण्यासाठी कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातर्फे "कोरोना वॉरियर केंद्रे' संपूर्ण महाराष्ट्रात सुरू केले आहे. 

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय संचारबंदी आणि लॉकडाउन जाहीर केले आहे. अशा आणीबाणीच्या परिस्थितीत नागरिकांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहावे यासाठी रामटेक येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या योग विभागातर्फे "कोरोना वॉरियर केंद्रे' तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. या केंद्राद्वारे राज्यातील सर्व महाविद्यालयांमधील योग विभागाला जोडण्यात आले आहे. त्यातून ऑनलाईन मोफत सल्ल्याची व्यवस्था व समुपदेशन करण्यात येईल. हा हेल्प डेस्क "केकेएसयू कोरोना वॉरियर' नावाने विद्यापीठाच्या kksanskrutuni.digitaluniversity.ac या वेबसाईटवर उपलब्ध आहे. कोरोनाविषयक भीती, तणाव, अस्वस्थता नागरिकांमध्ये आहे. काही गैरसमजदेखील आहेत. ते दूर करण्यासाठी तसेच कोरोनाग्रस्त व कोरोनातून बाहेर पडलेल्या रुग्णांकरिता देखील हे समुपदेश सल्ला केंद्र चालविले जात आहे. या निःशुल्क सल्ला केंद्रांच्या माध्यमातून कोणीही योगतज्ज्ञांना आपल्या शंका विचारू शकतात. 

कोविद समस्यांकरिता "योग मार्गदर्शिका'

राज्यातील कैवल्यधाम लोणावळा, योगविद्या गुरुकुल नाशिक, चक्रपाणी महाविद्यालय नागपूर, आदियोग आंतरराष्ट्रीय योग संस्था नाशिक, निर्धार योग प्रबोधिनी जळगाव, घंटाली मित्रा मंडळ ठाणे या महाराष्ट्रातील विश्वविद्यालय संलग्नित योग महाविद्यालयांचा यामध्ये सक्रिय सहभाग आहे. प्रत्येकाने स्वतःची व्यवस्थित काळजी घेण्यासाठी कोविद समस्यांकरिता "योग मार्गदर्शिका' देखील सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही मार्गदर्शिका विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. अधिक माहितीसाठी भारतीय दर्शन विभाग प्रमुख डॉ. कलापिनी अगस्ती यांच्या 8275394979 या क्रमांकावर संपर्क साधावा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com