"यांच्या'सह विदर्भातील तीन मंत्री मोटारीने तडकाफडकी गेले मुंबईला! काय असावे कारण... 

Ministers
Ministers

नागपूर : महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन, दुग्धविकास व क्रीडामंत्री आणि वर्धेचे पालकमंत्री सुनील केदार तसेच मदत, पुनर्वसन व बहुजन कल्याण विभागाचे मंत्री आणि चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार लॉकडाऊन आणि संचारबंदी असतानाही नुकतेच मोटारींनी मुंबईला गेले होते. पैकी डॉ. नितीन राऊत, सुनील केदार आणि विजय वडेट्टीवार परत आले, मात्र नाना पटोले मुंबईतच आहेत. या चार "विदर्भविरां'च्या मुंबई भेटीबाबत विविध अंदाज लावले जात आहेत. पण वास्तविकता काय आहे, हे आज या नेत्यांनी "सरकारनामा'ला सांगितले. 

मंत्र्यांना विश्‍वासात घेतले जात नाही : वडेट्टीवार 

विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्याचे मुख्य सचिव प्रत्येक कामात परवानगीसाठी अडवणूक करतात. त्यामुळे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासोबत चर्चा करायला मुंबईला गेलो होतो. प्रशासनातर्फे केल्या जात असलेल्या उपाययोजनांमध्ये विदर्भाला काय मिळत आहे, याबाबतची माहिती मुख्य सचिवांकडून संबंधित मंत्र्यांना दिली जात नाही. कोणताही निर्णय घेताना मंत्र्यांना विश्‍वासात घेतले जात नाही. शेवटी प्रत्येक मंत्री व आमदारांना त्यांचा जिल्हा, मतदारसंघही सांभाळायचा आहे. जिल्ह्याच्या स्थानिक विकास निधीवर आमचा अधिकार आहे. पण त्यातून करावयाच्या कामांवरही परवानगीचे अडथळे लावण्यात आले आहेत. कोरोनाशी लढा देताना व्हेंटीलेटर खरेदी करायचे असल्यासही परवानगीची अट आहे. व्हेंटीलेटरसाठी एक ते दीड कोटी रुपये लागतात. आता त्यासाठी कशाला हवी परवानगी? स्थिती गंभीर झाली तर मुख्य सचिव घेतील का जबाबदारी? आतापर्यंत नव्हती लागत अन्‌ आत्ताच कसा काय हा नियम आला, असा प्रश्‍न करीत जिल्ह्यात काम करताना अशा एक ना अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे मुंबईला गेलो होतो. 
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा केली. त्यांनी यावर उपाययोजना केली. संबंधितांना तसे निर्देश दिले. त्यामुळे आता यापुढे काम करताना अडचणी येणार नाही, अशी अपेक्षा असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. 

बोलणाऱ्यांनी परिस्थितीचे भान ठेवावे : नाना पटोले 

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले, भौगोलिक परिस्थिती सगळीकडे सारखी नाही. काही जीआर महाराष्ट्रात तेथील भौगोलिक परिस्थितीनुसार लागू व्हावे, यासाठी मुंबईला गेलो होतो. प्रवासाची सर्व साधने बंद असल्यामुळे कारने जावे लागले. संबंधितांशी चर्चा करून जीआर संदर्भात निर्णय घेतले गेले. सर्वांनी स्वतःला, कुटुंबाला सांभाळून इतरांना मदत करण्याची ही वेळ आहे. परिस्थिती लवकर नियंत्रणात आली नाही, तर राज्याच्या काही भागात लोकांवर उपासमारीची वेळही येऊ शकते. त्यामुळे तातडीने उपाययोजना करण्यासाठी तत्काळ मुंबईला जावे लागले. आमच्या या दौऱ्याबाबत उलटसुलट बोलणाऱ्यांनी निदान परिस्थितीचे तरी भान ठेवावे आणि भलत्याच चर्चा घडवल्यापेक्षा लोकांना मदत करण्याकडे लक्ष केंद्रित करावे. 

कोरोनाच्या परिस्थितीवर चर्चा : केदार 

क्रीडामंत्री सुनील केदार म्हणाले, राज्यात कोरोनाचा विळखा दिवसागणिक घट्ट होत चालला आहे. या गंभीर परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी सरकार सर्व पातळ्यांवर काम करीत आहे. सर्व मंत्री आपआपल्या क्षेत्रातून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी लढा देत आहेत. सरकार म्हणून सर्व काम सुरू असले तरी पक्ष पातळीवर अजून काय करता येऊ शकते आणि हा लढा अधिक तीव्र कसा करता येईल, यासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा केली. पक्षाचे मंत्री आणि आमदारांनी स्थानिक पातळीवर काय केले पाहिजे, हे ठरविण्यात आले आहे. त्यानुसार पुढील कामाला सुरुवात झाली आहे. 
यासंदर्भात नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com