तुम्हाला चटपटीत खायला आवडते का? बस... आलीच समजा "खाऊ गल्ली'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 जानेवारी 2020

नागपूर : गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षा करणाऱ्या नागपूरकर खवय्यांसाठी येत्या 9 जानेवारीपासून "खाऊ गल्ली' सुरू करण्यात येणार आहे. 32 स्टॉलधारकांना येथे स्टॉल देण्यात आले असून, रामन सायन्स केंद्राला लागून रस्त्यावर असलेले आठ स्टॉलही आकर्षक करण्यात येणार आहे. त्यामुळे या रस्त्यावरील चोरबाजाराची समस्याही कायमस्वरुपी निकाली निघणार आहे.

हे वाचाच - जिद्द असावी तर अशी

नागपूर : गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षा करणाऱ्या नागपूरकर खवय्यांसाठी येत्या 9 जानेवारीपासून "खाऊ गल्ली' सुरू करण्यात येणार आहे. 32 स्टॉलधारकांना येथे स्टॉल देण्यात आले असून, रामन सायन्स केंद्राला लागून रस्त्यावर असलेले आठ स्टॉलही आकर्षक करण्यात येणार आहे. त्यामुळे या रस्त्यावरील चोरबाजाराची समस्याही कायमस्वरुपी निकाली निघणार आहे.

हे वाचाच - जिद्द असावी तर अशी

बहुप्रतिक्षित खाऊ गल्लीचे काम अखेरच्या टप्प्यात आहे. 9 जानेवारीपर्यंत किरकोळ कामे पूर्ण होईल. 9 जानेवारीला सायंकाळी सहा वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते खाऊ गल्लीचे उद्‌घाटन होईल, असे महापौर संदीप जोशी यांनी गांधीसागर येथील खाऊ गल्ली परिसरात पत्रकारपरिषदेत सांगितले. उद्‌घाटन समारंभाला सार्वजनिक बांधकाममंत्री नितीन राऊत, मंत्री अनिल देशमुख, मंत्री सुनील केदार, खासदार डॉ. विकास महात्मे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार नागो गाणार, आमदार प्रकाश गाणार, आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, आमदार अनिल सोले, आमदार गिरीश व्यास, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, आमदार मोहन मते, आमदार विकास ठाकरे, नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित राहतील.

चार वर्षांपूर्वी तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष बंडू राऊत यांनी खाऊ गल्लीची संकल्पनाच नव्हे तर खर्चाचा प्रस्तावही मंजूर केला. त्यांच्या कार्यकाळात कामही सुरू झाले. मात्र, ते पदमुक्‍त होताच गेली साडेतीन वर्षे खाऊ गल्ली रखडली. अखेर महापौर जोशी यांनी पुढाकार घेतला व बंडू राऊत यांच्या संकल्पनेला मूर्तस्वरूप आले. खाऊ गल्लीमध्ये येणाऱ्या नागरिकांसाठी बालभवनच्या परिसरात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

येथे "पे ऍण्ड पार्क'बाबत सहा जानेवारीला निविदा प्रक्रिया पूर्ण होणार आहे. महापौरांनी आज केलेल्या पाहणी दौऱ्यात उपमहापौर मनीषा कोठे, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, धंतोली झोन सभापती लता काडगाये, क्रीडा समिती सभापती प्रमोद चिखले, नगरसेविका हर्षला साबळे, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, माजी स्थायी समिती सभापती सुधीर (बंडू) राऊत, मनोज साबळे आदी उपस्थित होते.

सायंकाळी मार्ग बंद करण्याची मागणी

खाऊ गल्लीमध्ये येणाऱ्या नागरिकांची गर्दी लक्षात घेता रामन विज्ञान केंद्रासमोरील रस्ता सायंकाळी सहा ते रात्री 11 वाजता दरम्यान बंद ठेवण्याची मागणी स्थानिक नगरसेवकांकडून केली जात आहे. याबाबत आवश्‍यक चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे महापौर संदीप जोशी यांनी नमुद केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'khau galli' will start in Nagpur till January 9