esakal | २६ वर्षांपूर्वीचे अधिवेशन : भाकरीचा घास घेणार तोच बंदुकीचा आवाज आणि ११४ गोवारी बांधवांचा जीव गेला
sakal

बोलून बातमी शोधा

Krantinad on Gowari massacre from Zero Mile Stone

११४ गोवारींचा जीव गेला. यानंतर सत्तेवर आलेल्या ‘ब्रॅन्डेड माणसांनी ब्रेनडेड आश्वासन’ दिल्याचा धिक्कार कवितेतून मांडला आहे. हक्कासाठी सुरू झालेल्या गोवारी बांधवांचे युद्ध अवघ्या १५ मिनिटांत शांत झाले, मात्र गोवारी बांधवांच्या मृतदेहांचा सडा झीरो माईल स्टोनसमोर पडला. येथील मृतदेहांची रांग मेडिकलमध्ये लावली होती, ही नोंद माईलस्टोनमध्ये नोंदवली.

२६ वर्षांपूर्वीचे अधिवेशन : भाकरीचा घास घेणार तोच बंदुकीचा आवाज आणि ११४ गोवारी बांधवांचा जीव गेला

sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर : हिवाळी अधिवेशनाचा काळ. २३ नोव्हेंबर १९९४ चा दिवस. गोवारी समाज हक्क मागण्यासाठी नागपुरात आला. सायंकाळचे सहा वाजून गेले, मात्र गोवारींच्या मोर्चाची दखलच घेतली नाही. मुख्यमंत्री येतील, गोवारींचे ऐकतील. या प्रतीक्षेत मोर्चेकऱ्यांचा जीव तहानेने व्याकूळ झाला होता. काहींनी फाटलेल्या लुगड्याच्या कापडात बांधून आणलेली कांद्या मिरच्यांची शिदोरी सोडली. भाकरीचा घास घेणार तोच बंदुकीच्या गोळीचा आवाज आला.

इलेक्‍ट्रिकची तार तुटली, या जिवंत तारेने अनेक जण भाजले. एकच गलका झाला. या गर्दीत नऊ महिन्यांची गर्भवती माता खाली कोसळली, पोटावर लाथा पडल्याने गर्भातून बाळ बाहेर आलं... त्या मातेच्या प्रसूतीच्या वेदना येथेच गळून पडल्या. हक्कासाठी आलेल्या ११४ गोवारी बांधवांनी रक्ताचा अभिषेक दिला. खाकी वर्दीतील माणसांनी रस्त्यावर सांडलेले ‘रक्त' पाणी आणून धुतले. २६ वर्षांपूर्वीच्या ह्रदयाच्या चिरकांड्या उडवणाऱ्या गोवारी हत्याकांडावर कवी शेषराव नेवारे यांनी ‘झिरो माईल स्टोन’ कवितासंग्रहातून एक नवा क्रांतिनाद केला.

सविस्तर वाचा - दुर्दैवी! फराळाचे पदार्थ करताना अचानक घरात पसरला धूर आणि क्षणाधार्त संसाराची झाली राखरांगोळी

भारतीय संविधानाच्या पहिले पानावर ‘आम्ही भारताचे लोक’ प्रास्ताविका आहे. आम्ही भारताचे लोक या कवितेने शेषराव नेवारे यांनी कवितांचा प्रारंभ केला. आम्ही भारताचे लोकं असून आम्हालाच चिरडून टाकता, आमच्या हक्कासाठी आम्हीच येतो रस्त्यावर असा निषेध नोंदवण्यासाठी या कवितेचा अतिशय समर्पक वापर त्यांनी केला. आमचेच करता कोबिंग ऑपरेशन असा सवालही त्यांनी एका कवितेतून केला.

काय होती, गोवारी समाजाची मागणी?, अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळालेच पाहिजे, गोवारी जातीचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी २३ नोव्हेंबर १९९४ रोजी ‘खून भी देंगे, जान भी देंगे, हक हमारे लेकर रहेंगे' या घोषणेच्या गजरात संविधानाने दिलेला अधिकार व हक्कासाठी नागपुरात आले होते. मात्र, नियतीने नव्हे तर सत्ताधाऱ्यांनी घात केला.

अधिक वाचा - चला मुलांनो, सोमवारपासून शाळेत या! ऑनलाईन बैठकीत घेतला निर्णय

११४ गोवारींचा जीव गेला. यानंतर सत्तेवर आलेल्या ‘ब्रॅन्डेड माणसांनी ब्रेनडेड आश्वासन’ दिल्याचा धिक्कार कवितेतून मांडला आहे. हक्कासाठी सुरू झालेल्या गोवारी बांधवांचे युद्ध अवघ्या १५ मिनिटांत शांत झाले, मात्र गोवारी बांधवांच्या मृतदेहांचा सडा झीरो माईल स्टोनसमोर पडला. येथील मृतदेहांची रांग मेडिकलमध्ये लावली होती, ही नोंद माईलस्टोनमध्ये नोंदवली.

एकाच विषयावर ६० कविता

शेषराव नेवारे यांच्या काव्यसंग्रहात ६० कविता आहेत. ‘हिस्से’, ‘विधानसभा’, मरणाची साखळी, स्वल्पविराम, लढ्याचा साक्षीदार, हा मोर्चा आपलाच हाय, आकडा, सलाम, हाय सलाम, मी आज विधानसभेवर, जिवंत हाय, किंकाळ्या, मावळत्या सूर्याच्या साक्षीने, शिकार, त्यांच्या संसाराच्या राखरांगोळ्या, पंचनामा, बंद, चिता पेटतील, हत्याकांडांन चिरघराचा रेकार्डब्रेक, मी शोधतोय तुला, आकटा, ती रात आठवते अजुनी, हत्याकांडा, मयत, फिर्याद, आंधळी, बहिरी, मुकी रात, माय झोपडीत परत येईल, पदर, स्मृतिचा दिवा, विद्रोहाची मशाल, भाकरीच्या तुकड्यासाठी, चित्रकारा, तुला केलय गजाआड, सत्यमेव जयते, अंगभर गोंदण, बेपत्ता, संस्कृती, विकासाचा सूर्य, कोंडमारा, गेचूड, कुडोचा करार, गुलामीचं मुक्तिगीत, शहिद पचापचा थुंकले, अशा एकापेक्षा एक कविता यात आहेत. विशेष असे की, शेषराव मोरे यांनी केवळ गोवारी हत्याकांड केंद्रस्थानी ठेवून ६० कविता एकाच विषयावर एकाच कवीने झीरो माईल स्टोनमध्ये मांडल्या. दगडी स्मारकात बंदिस्त गोवरी शहिदांच्या रक्तशिल्पाला अभिवादन करण्याचा हा अनोखा प्रकार आहे. 

क्लिक करा - ह्रदयद्रावक! चारित्र्यावर संशय; पोटात चार महिन्याचे बाळ असतानाही पूनमने गळफास लावून केली आत्महत्या

आजही संघर्ष करावा लागत आहे
गोवारी हक्काची लढाई आम्ही रस्त्यावर लढलो. ११४ जणांचे बळी गेले. या शहिदांचे रक्त वाया जाऊ नये म्हणून रस्त्यावरील लढाई न्यायालयात नेली. न्यायालयीन लढाई जिंकलो. जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आजही संघर्ष करावा लागत आहे. शासनातील अधिकारी आम्हाला आदिवासी जात प्रमाणपत्रासाठी आजही अडवणूक करतात. आमची मागणी पूर्ण होईल त्या दिवशी झीरो माईल स्टोन हा काव्यसंग्रह लिहिल्याचे समाधान मिळेल. 
- शेषराव नेवारे,
कवी, झीरो माईल स्टोन

 संपादन - नीलेश डाखोरे