राज्य बालनाट्य स्पर्धेत "कृष्णनीती' प्रथम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 जानेवारी 2020

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फेआयोजित स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे निकाल जाहीर झाले. दिग्दर्शन : प्रथम पारितोषिक मेघा पाध्ये (नाटक-कृष्णनीती), द्वितीय पारितोषिक श्रेयस अतकर (नाटक थेंब थेंब श्वास), प्रकाशयोजना प्रथम पारितोषिक निकिता ढाकूलकर (नाटक आझादी के नाम), द्वितीय पारितोषिक रेहान बत्तासे (नाटक-पब्जी टॉक),

नागपूर : महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत नागपूर केंद्रातून दी ब्लाइंड रिलीफ असोसिएशन, नागपूर संस्थेच्या "कृष्णनीती' नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाले. बहुजन रंगभूमी संस्थेच्या "थेंब थेंब श्वास' नाटकास द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड झाली.

हे वाचाच - अबब तब्बल एक लाख १५ हजारांचा आकडा

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फेआयोजित स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे निकाल जाहीर झाले. दिग्दर्शन : प्रथम पारितोषिक मेघा पाध्ये (नाटक-कृष्णनीती), द्वितीय पारितोषिक श्रेयस अतकर (नाटक थेंब थेंब श्वास), प्रकाशयोजना प्रथम पारितोषिक निकिता ढाकूलकर (नाटक आझादी के नाम), द्वितीय पारितोषिक रेहान बत्तासे (नाटक-पब्जी टॉक), नेपथ्य : प्रथम पारितोषिक एस. एस. आतरकर (नाटक-थेंब थेंब श्‍वास), द्वितीय पारितोषिक रोशन ढवळे (नाटक-घायाळ पाखरा), रंगभूषा : प्रथम पारितोषिक गिरोजा सप्तर्षी (नाटक- कृष्णनीती), द्वितीय पारितोषिक शुभांगी कापसे (नाटक सतरंगी बायस्कोप), उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक देव ननावरे (नाटक थेंब थेंब श्‍वास) व मृण्मयी पांडे (नाटक-कृष्णनीती), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे अनया शिपी (नाटक थेंब थेंब श्‍वास), अनुष्का शेंडे (नाटक-घायाळ पाखरा), गीतिका रेवतकर (नाटक-गुरुदक्षिणा), देवश्री नंदवंशी (नाटक-चिन्ह), आस्था रेवतकर (नाटक-साई), ओम राऊत (नाटक-घायाळ पाखरा), श्‍लोक पारवे (नाटक-घायाळ पाखरा), रुद्र घांगरेकर (नाटक-ताई), कोशिक गणेश (नाटक आम्हालाही पंख हवेत), संकेत गलगल (नाटक-सतरंगी बायस्कोप), सायंटिफिक सभागृह, नागपूर येथे अतिशय जल्लोषात झालेल्या स्पर्धेत एकूण 21 नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. परीक्षक म्हणून रमेश भिडे, मधुमती पवार आणि अंजलो धारू यांनी काम पाहिले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Krishnaniti first in the state ballet competition