अबब! तब्बल एक लाख 15 हजारांचा आकडा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 जानेवारी 2020

घोषवाक्‍य तयार करीत विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी कल्पकता आणि स्वच्छतेबाबत जाणिवेचा परिचय आज नागपूरकरांना करून दिला.
मनपा, शालेय शिक्षण विभाग आणि पोलिस वाहतूक विभागाच्या वतीने आयोजित "मम्मी पापा यू टू' अभियानांतर्गत पहिल्या दिवशी नागपूर शहरातील विद्यार्थ्यांसाठी घोषवाक्‍य स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत मनपाच्या शाळांसह एकूण 926 शाळांतील एक लाख 15 हजार 536 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

नागपूर : "खुबसुरत होगा नागपूर हर छोर, क्‍यूं की मम्मी पापा जो मिल रहे है सफाई करने के लिए चारो ओर, "आओ मिलकर सबको जगाएं, गंदगी को स्वच्छता से दूर भगाएं', "कदम कदम से कदम और हाथ में हाथ मिलाना है, नागपुर को सबसे श्रेष्ठ और सुंदर बनाना है', "उरलेले अन्न जमा करीन डब्यात, कचऱ्याची गाडी आली टाकीन हिरव्या डब्यात', "आई-बाबा सांगत्ये मी तुम्हाला, लागा तुम्ही नागपूर स्वच्छतेच्या कामाला' अशा एकापेक्षा एक घोषवाक्‍य तयार करीत विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी कल्पकता आणि स्वच्छतेबाबत जाणिवेचा परिचय आज नागपूरकरांना करून दिला.
मनपा, शालेय शिक्षण विभाग आणि पोलिस वाहतूक विभागाच्या वतीने आयोजित "मम्मी पापा यू टू' अभियानांतर्गत पहिल्या दिवशी नागपूर शहरातील विद्यार्थ्यांसाठी घोषवाक्‍य स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत मनपाच्या शाळांसह एकूण 926 शाळांतील एक लाख 15 हजार 536 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

सविस्तर वाचा - बाजारात वाढली महिलांची गर्दी , पण कशासाठी

घोषवाक्‍यासह सर्व शाळांतील विद्यार्थी 17 जानेवारीला सकाळी 8.30 वाजता मानवी साखळी तयार करणार आहे. घोषवाक्‍यांच्या घोषणा देत स्वच्छतेविषयी आणि वाहतूक नियम पाळण्यासंदर्भात जनजागृती करणार आहे. घोषवाक्‍य स्पर्धा पाचवी ते आठवी व नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली. या स्पर्धेतून प्रत्येक शाळेतील एक उत्कृष्ट घोषवाक्‍य निवडण्यात येईल. घोषवाक्‍य स्पर्धेसाठी प्रथम 11 हजार रुपये, द्वितीय पाच हजार रुपये तर तृतीय तीन हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. प्रत्येकी एक हजार रुपयांचे दहा उत्तेजनार्थ पारितोषिकही देण्यात येईल. शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर यांच्या मार्गदर्शनात आणि मुख्याध्यापकांच्या नेतृत्वात प्रत्येक शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

महापौर, आयुक्तांनी केले कौतुक
एखाद्या चांगल्या उद्देशासाठी शहरातील सर्वच शाळांतील विद्यार्थ्यांनी इतक्‍या मोठ्या प्रमाणावर स्पर्धेत सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी पहिल्याच स्पर्धेला दिलेल्या प्रतिसादाबद्दल महापौर संदीप जोशी आणि आयुक्त अभिजित बांगर यांनी सर्वांचे अभिनंदन करीत कौतुक केले आहे.

पथनाट्य स्पर्धा
अभियानांतर्गत मंगळवारी पथनाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा प्रथम शाळास्तरावर होईल. यातून केंद्रस्तरावर उत्कृष्ट पथनाट्यांची निवड करून पाठविण्यात येईल. त्यातून उत्कृष्ट पथनाट्यांची निवड शाळास्तरावर करण्यात येईल, अशी माहिती शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर यांनी दिली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mammi pappa you to !