esakal | खाटा, रेमडिसिव्हिरनंतर आता ऑक्सिजनचा तुटवडा; नागपुरातील परिस्थिती

बोलून बातमी शोधा

Lack of oxygen now after bed Remdesivir Nagpur news

ऑक्सिजनाचा तुटवडा भासू नये म्हणून अन्न व औषधी पुरवठा मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी उद्योगांना ऑक्सिजनचा पुरवठा बंद करण्याचे निर्देश दिलेले आहेत.

खाटा, रेमडिसिव्हिरनंतर आता ऑक्सिजनचा तुटवडा; नागपुरातील परिस्थिती
sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर : राज्यासह शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे ऑक्सिजनच्या मागणीत खूप वाढ झालेली आहे. बेड, रेमडिसिव्हिरनंतर आता ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला आहे. जिल्ह्यात पाच ते सहाच ऑक्सिजनचे पुरवठादार असून आता पुरवठा जिल्हा प्रशासनाने स्वतःच्या हातात घेतला आहे. त्यासाठी प्रशासनाकडून स्वतःची साखळी निर्माण करण्याच्या तयारीला लागल्याची माहिती पुढे आली आहे.

कोरोना रुग्णावरील औषधोपचार म्हणजे प्रामुख्याने रुग्णाला ऑक्सिजनचा पुरवठा करणे आहे. सध्या शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे खासगी आणि शासकीय रुग्णालय हाउसफुल्ल झाले असून काही रुग्णांना अमरावतीला पाठविण्याची तयारी प्रशासनाने सुरू केलेली आहे. ऑक्सिजनाचा तुटवडा भासू नये म्हणून अन्न व औषधी पुरवठा मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी उद्योगांना ऑक्सिजनचा पुरवठा बंद करण्याचे निर्देश दिलेले आहेत.

अधिक वाचा - ‘कोरोना नाहीच, मला कोरोना होणार नाही’ हा भ्रम चुकीचा; पोस्टकोविड परिणामांची वेळीच काळजी घ्या 

असे असताना काही ऑक्सिजन पुरवठादारांना बुटीबोरी येथून द्रवरूपातील (लिक्विड) ऑक्सिजनचा पुरवठा होणे बंद झाले आहे. त्यामुळे काही पुरवठादारांनी ऑक्सिजनचा पुरवठा बंद केल्याची माहिती आहे. याबाबत बोलताना ऑक्सिजन पुरवठादार बी. सी. भरतीया म्हणाले, आम्हाला द्रवरुपातील ऑक्सिजनचा पुरवठा बुटीबोरीतून झाला नाही. त्यामुळे आम्हाला ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास अडचणी जाऊ लागल्या आहेत. उत्पादनही बंद झालेले आहे. प्रशासनाने ऑक्सिजनचा पुरवठ्यावर नियंत्रण मिळविले आहे.

कडक कारवाई करण्यात येईल
सध्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याचे दिसत आहे. या इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. 
- डॉ. नितीन राऊत, पालकमंत्री