sakal

बोलून बातमी शोधा

file photo

कामात कोणी बाधा आणल्यास ते आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व भारतीय दंड संहिता अनुसार कार्यवाहीस पात्र राहतील, असे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले आहेत. 

कोरोना रुग्णांच्या मृतदेहावर घाटातच होणार अंत्यसंस्कार.. विरोध करणाऱ्यांवर होणार कारवाई

sakal_logo
By
नीलेश डोये

नागपूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून मृत्यू संख्येतही वाढ होत आहे. या मृतांच्या अंत्यसंस्कारास स्थानिकांचा विरोध होत असल्याने नातेवाइकांची अडचण होते. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी रहिवाशांच्या क्षेत्रातील दहन घाटावर अंत्यसंस्कार करता येणार असल्याचे स्पष्ट करीत विरोध करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेत.

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. शासन निर्देशानुसार त्यांना होम आयसोलेशन सुरू करण्यात आले आहे. काही बाबतीत अशा रुग्णांच्या मृत्यू होतो. काही क्षेत्रात कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींची अंत्यसंस्कार करण्याबाबत स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. त्यामुळे मृत व्यक्तींच्या परीजनांना मृतदेह अंत्यसंस्कारासाठी इतर ठिकाणी नेणे भाग पडते.

ग्रामपंचायतींनी केला ९ कोटींचा घोटाळा, वाचा संपू्र्ण प्रकार 

अशा ठिकाणी सुद्धा कधी कधी लोकांचा विरोध निर्माण होतो. अशा परिस्थितीत व्यक्तींच्या कुटुंबीयांना नाहक शारीरिक व मानसिक त्रासास सामोरे जावे लागते. मृत व्यक्तीचे अंत्यसंस्काराबाबत नियमित दहनघाटावर दहन करण्याचे विरुद्ध कुठलेही निर्देश नाहीत. गैरसमजुतीमुळे लोकांकडून विरोध होतो. या करिता लोकांमध्ये जागरूकता निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे.

अंत्यसंस्कारास कुठेही विरोध होऊ नये याकरिता कोरोना रुग्ण मृत झाल्यास त्याचे क्षेत्रातील रहिवाशांचे दहन घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. कोणतीही व्यक्ती किंवा दहन घाटाचे प्रभारी अधिकारी अंत्यसंस्कारास अडथळा करणार नाहीत.

अधिक माहितीसाठी - पतीला तिळतिळ मरताना बघू शकत नाही.. असं म्हणत तिनं उचललं टोकाचं पाऊल.. आणि सगळंच संपलं

शासनाद्वारे निर्गमित एसओपीचे पालन करणे आवश्यक राहील. अशा कामात कोणी बाधा आणल्यास ते आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व भारतीय दंड संहिता अनुसार कार्यवाहीस पात्र राहतील, असे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले आहेत. 

संपादन - अथर्व महांकाळ 

go to top