पतीला तिळतिळ मरताना बघू शकत नाही.. असं म्हणत तिनं उचललं टोकाचं पाऊल.. आणि सगळंच संपलं  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Wife took extreme by giving high dose injection to children and husband

‘माझ्या उच्चशिक्षित असलेल्या प्राध्यापक पतीला अशा दयनीय अवस्थेत पाहू शकत नाही. तो खूप खचला आहे. त्यामुळे असा निर्णय घेत आहे.’ असे डॉक्टर असलेल्या पत्नीने सुसाईड नोटमध्ये लिहिले.

पतीला तिळतिळ मरताना बघू शकत नाही.. असं म्हणत तिनं उचललं टोकाचं पाऊल.. आणि सगळंच संपलं 

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : उच्चशिक्षित दाम्पत्याच्या आत्महत्येबद्दल समजतच संपूर्ण हादरून गेले आहे. सुखी कुटुंबाचा अशा पद्धतीने अंत व्हावा यावर कोणाचाही विश्वास बसत नाहीये. तर दुसरीकडे मात्र ही आत्महत्या की हत्या अशा शंकाही डोकं वर काढू लागल्या आहेत. त्यातच आता सूत्रांकडून महत्वाची माहिती समोर आली आहे.  

‘माझ्या उच्चशिक्षित असलेल्या प्राध्यापक पतीला अशा दयनीय अवस्थेत पाहू शकत नाही. तो खूप खचला आहे. त्यामुळे असा निर्णय घेत आहे.’ असे डॉक्टर असलेल्या पत्नीने सुसाईड नोटमध्ये लिहिले. त्यानंतर पतीला आणि दोन्ही केविलवाण्या चिमुकल्यांना इंजेक्शन दिले, अशा माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.

हेही वाचा - नक्की कसे होतात किन्नरांवर अंत्यसंस्कार? काय आहेत प्रथा आणि परंपरा.. एकदा वाचाच

सूत्रांच्या माहितीनुसार, प्रा. धीरज दिगंबर राणे यांचे आई-वडील लहान वयातच मरण पावले. अनाथ झालेल्या धीरजला आत्या प्रमिला यांनी दत्तक घेतले. त्याचे पालनपोषण करून उच्चशिक्षित बनवले. एका नामांकित कॉलेजमधे प्राध्यापक पदावर धीरज कार्यरत होते. गेल्या १३ वर्षापूर्वी धीरज आणि उच्चशिक्षित सुषमा हिच्याशी विवाह झाला. 

सुषमा ही डॉक्टर असून नामांकित हॉस्पीटलमध्ये कार्यरत आहे. ध्रुव आणि लावण्या अशी दोन फुले त्यांच्या संसारवेलीवर उमलली. दोघांचाही संसार आनंदात आणि सुरळीत सुरू होता. गेल्या काही दिवसांपासून पती-पत्नीत वाद सुरू होता. एकलकोंडा झालेल्या धीरज यांनी पत्नीला अडचण सांगितली होती. तेव्हापासून डॉ. सुषमासुध्दा अस्वस्थ झाल्या होत्या. पतीला रोज तिळतिळ मरताना पाहून त्या बेचैन होत होत्या. शेवटी त्यांनी पतीसह स्वतःला संपविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पतीला ‘हायडोज’ असलेले इंजेक्शन दिले आणि स्वतःही गळफास घेतला, अशी माहिती आहे.

क्लिक करा - काय म्हणता? चक्क महापौर संदीप जोशी चौकात मारणार दंड-बैठका

माझ्या मुलांचे काय?

पतीसह स्वतःला संपविल्यानंतर माझ्या दोन्ही मुलांचे काय होणार हा प्रश्‍न डॉ. सुषमा हिला सतावत होता. भविष्यात दोन्ही मुले कुणाच्या भरोश्‍यावर जगतील? याचे उत्तर सापडत नसल्यामुळे डॉ. सुषमाने छातीवर दगड ठेवत दोन्ही चिमुकल्यांनाही ‘हायडोज’ असलेले इंजेक्शन दिले. दोघांचाही डोळ्यादेखत जीव गेल्यानंतर आईनेही गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी माहिती आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image
go to top