चहावाल्याच्या राज्यात कोण भोगतोय वनवास ? वाचा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जून 2020

महाविकास आघाडी सरकारने नुकतेच अनलॉकच्या माध्यमातून पुनःश्‍च हरिओम म्हणत उद्योग, व्यवसाय, दुकाने, आस्थापना, तसेच हॉटेल, होम डिलिव्हरी यासारख्या छोट्या मोठ्या उद्योगांना अटी, शर्थी घालून व्यवसाय करण्यास परवानगी दिली आहे. मात्र अद्यापही हातावर पोट असलेल्या काहींना मात्र स्वत:चे व्यवसाय उघडता आलेले नाहीत. चहावाल्याच्या राज्यात नेमकी कोणाला भोगावा लागतोय हा वनवास तुम्हीच बघा... 

नागपूर : महाविकास आघाडी सरकारने नुकतेच अनलॉकच्या माध्यमातून पुनःश्‍च हरिओम म्हणत उद्योग, व्यवसाय, दुकाने, आस्थापना, तसेच हॉटेल, होम डिलिव्हरी यासारख्या छोट्या मोठ्या उद्योगांना अटी, शर्थी घालून व्यवसाय करण्यास परवानगी दिली आहे. मात्र अद्यापही हातावर पोट असलेल्या काहींना मात्र स्वत:चे व्यवसाय उघडता आलेले नाहीत. चहावाल्याच्या राज्यात नेमकी कोणाला भोगावा लागतोय हा वनवास तुम्हीच बघा... 

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस रामकिशन ओझा यांनी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना पत्र लिहिले आहे. चहाच्या टपऱ्या, छोट्या गाड्यांच्या माध्यमातून खाद्यपदार्थ विकून पोट भरणाऱ्यांची संख्या राज्यात लाखोंच्या घरात आहे. लॉकडाऊनमुळे या छोट्या टपरी, गाड्या चालवणाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. शिवाय अन्न धान्याच्या किटचे वितरणही समाजसेवी संस्थांनी बंद केले आहे. त्यामुळे केवळ स्वत:च्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी या घटकालाही सोशल डिस्टन्स पाळणे, मास्क लावणे, तसेच गाडे, टपरीच्या आसपासचा परिसर स्वच्छ व निर्जंतूक ठेवणे, अशा अटी शर्थींसह टपऱ्या सुरू करण्याची परवानगी द्यावी, जेणेकरून त्यांच्याही हातात चार पैसे येऊन घर चालवण्यास मदतच होईल असे ओझा म्हणाले आहेत. 

वाचा : आधी होती रोज 20 हजार किलोंची मागणी, आता डबघाईस आला हा व्यवसाय  

रोजगारच हिरावला गेल्यामुळे तीन महिन्यांपासून त्यांचे जगणे मुश्‍कील झाले आहे. या संकट काळात कॉंग्रेस पक्ष तसेच महाविकास आघाडी सरकारने गरीब, कामगार, वंचित घटकाला यथाशक्ती मदतीचा हात दिलेला आहे. खाद्यपदार्थांची छोटी दुकाने, गाड्या, चहाच्या टपऱ्या सुरु करण्यास छोट्या व्यावसायिकांना परवानगी द्यावी. व्यवसायाचा पुनःश्‍च हरिओम करण्यास सांगावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस रामकिशन ओझा यांनी केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lockdown chahawala updates