लॉकडाउनमध्ये महिला बचत गटांची चांदी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जून 2020

बचत गटांनी तयार केलेले मास्क आरोग्य विभाग, ग्रामपंचायती, पोलिस विभाग, शासनाच्या वेगवेगळ्या विभागांना पुरवण्यात आले.

नागपूर : कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी शासनाने मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. याचा लाभ जिल्ह्यातील महिला बचत गटांना झाला असून, लॉकडाउनच्या काळात या महिलांनी मास्क निर्मितीच्या माध्यमातून 52 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. 

लॉकडाउनच्या काळात देशातील सर्व व्यवसाय व उद्योग ठप्प पडले होते. ग्रामीण भागात तर कामधंदे नसल्याने परिस्थिती अतिशय बिकट झाली. पण या काळात घराला महिलांनी हातभार लावला. कोरोनामुळे मास्कच्या मागणीत वाढ झाली होती. एन-95 सारखे मास्क वापरणे सामान्यांना परवडणारे नव्हते. शिवाय मास्कचा तुटवडाही भासू लागला.

त्यामुळे मास्कचे वेगवेगळे पर्याय पुढे आले. हे लक्षात घेता जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील महिला बचत गटांना मास्क बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. महिला बचत गटांनी उत्स्फुर्तपणा मास्क निर्मिती केली. 

ग्रहणानंतरची पूजा बेतली जीवावर, वाघाडी नदीत बुडून बापलेकाचा मृत्यू

 बचत गटांनी तयार केलेले मास्क आरोग्य विभाग, ग्रामपंचायती, पोलिस विभाग, शासनाच्या वेगवेगळ्या विभागांना पुरवण्यात आले. जिल्ह्यातील तेराही तालुक्‍यातील बहुतांश महिला बचत गटांनी 2 लाख 90 मास्कची निर्मिती केली. हिंगणा तालुक्‍याती महिला बचत गटांनी जवळपास 70 हजार मास्कची निर्मिती केली. समूहांकडून तयार करून मिळणारे मास्कचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. यामुळे बचत गटातील महिलांना लॉकडाउनच्या काळात उत्पन्नाचे चांगले साधन मिळाले. अजूनही बचत गटांच्या मार्फत मास्कची निर्मिती सुरू आहे. 

 

मास्क तयार करण्यासाठी प्रोत्साहन
लॉकडाउनच्या काळात अनेकांचे व्यवसाय ठप्प पडले होते. आर्थिक स्त्रोतही कमी होते. महिला बचत गटांना मास्क तयार करण्यासाठी प्रोत्साहनसोबत सहकार्य केले. त्यांना याचा फायदा झाला. 
- विवेक इलमे, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, नागपूर. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown silver in the women's savings groups