अरे बापरे, आता हे काय नवीन संकट ! नरखेड तालुक्‍यात आकाशमार्गाने कोटयवधींच्या संख्येने दाखल, काय आहे ते....

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 मे 2020

मध्य प्रदेशातून टोळधाड कीड सातपुडा पर्वतरांगाच्या मार्गाने अमरावती व वर्धा जिल्ह्याच्या अनुक्रमे मोर्शी, वरुड व आष्टी तालुक्‍यातून आज (ता.25) दुपारी चार वाजेदरम्यान नरखेड तालुक्‍यातील खलानगोंदी शिवारात प्रथम देवीदास चोरे यांच्या शेतात दाखल झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे.

जलालखेडा (जि.नागपूर) : देशात कोरोनाचे संकट चालू असतानाच टोळधाडी कीटकांच्या झुंडीच्या झुंडी शेतावर आक्रमण करीत आहेत. नरखेड तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या मालावर टोळधाडी (नाकतोड्यांनी, ग्रास हॉपर) टोळांनी हल्ला चढवला असून दुहेरी अस्मानी संकटात नरखेड तालुक्‍यातील शेतकरी सापडले आहेत.

हेही वाचा  : अरे जरा ऐका रे ! होमक्‍वारंटाइन केलेल्यांनी उडविली प्रशासनाची झोप, मग प्रशासनाने केला उपाय....

शेतकऱ्यांमध्ये कमालीची दहशत
टोळधाड ( Locust ) नावाची कीड नरखेड तालुक्‍यामध्ये आल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. मध्य प्रदेशातून टोळधाड कीड सातपुडा पर्वतरांगाच्या मार्गाने अमरावती व वर्धा जिल्ह्याच्या अनुक्रमे मोर्शी, वरुड व आष्टी तालुक्‍यातून आज (ता.25) दुपारी चार वाजेदरम्यान नरखेड तालुक्‍यातील खलानगोंदी शिवारात प्रथम देवीदास चोरे यांच्या शेतात दाखल झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे. या नवीन संकटापासून शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण कसे करावे, या प्रश्नाच्या शोधात नरखेडचा कृषी

हेही वाचाः परवा प्रीतेश गेला, काल दत्तू...दोन्ही कामगारांच्या मृत्यूने कुटुंबीयांचे दुःख अनावर , मृत्यूचे कारण...

या पिकांचे करतात नुकसान...
टोळधाड किडीच्या (नाकतोडे) मोठ्या टोळक्‍यांनी शेतातील संत्रा, मका, मोसंबी, लिंबू, भाजीपाला यासह आदीच्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. टोळधाडीमध्ये कोट्यवधी संख्येने नाकतोडे असून ते एकाचवेळी पाच ते दहा किलोमीटर परिघातील शेकडो एकर शेतीतील रात्रीच्या वेळी टोळ सर्व प्रकारच्या झाडांची पाने कातरतात. यामुळे झाडाला फक्त खोड व काड्याच शिल्लक राहतात. कालांतराने ही झाडे वळतात. सध्या किती पिकांचे नुकसान या टोळ्यांनी केले, याचा आकडा मिळू शकला नाही.

पॉवरस्प्रे मशीनने फवारणी केल्यास 55 टक्के नियंत्रण
टोळधाड पिकावर समूहाने आक्रमण करीत असते. एका समूहामध्ये टोळ्यांची संख्या करोडो, अरबो असते. ती पाच ते दहा किलोमीटर पसरते. या पूर्ण क्षेत्रावर नियंत्रण करण्यासाठी ड्रोनद्वारे क्‍लोरोपायरीफॉस तक्के व साईपरमेथ्रीन ही रासायनिक औषधी एका लिटर पाण्यामध्ये चार मिलीचे मिश्रण बनवून फवारणी केल्यास उपयोगी ठरू शकते. ट्रॅक्‍टरला पॉवरस्प्रे मशीन लावून फवारणी केल्यास 55 टक्के नियंत्रण केले जाऊ शकते.
-डॉ.योगीराज जुमडे, कृषी अधिकारी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Locusts attack the goods of farmers in Narkhed taluka