esakal | दीड महिन्यापासून बंद दुकाने उघडली आणि...
sakal

बोलून बातमी शोधा

Long queues from early morning to buy alcohol

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 24 मार्चपासून अत्यावश्‍यक सेवा वगळता संपूर्ण लॉकडाउन करण्यात आले होते. शासनाने लॉकडाउनमध्ये शिथिलता देऊन 15 मेपासून काही अटींसह दुकाने खुली करण्याची परवानगी दिली.

दीड महिन्यापासून बंद दुकाने उघडली आणि...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कळमेश्‍वर  : दीड महिन्यापासून बंद असलेली दारूची दुकाने उघडल्याने दारू दुकानांवर तळीरामांची वर्दळ वाढली. शहरात विदेशी दारू ऑनलाइन तर ग्रामीण भागात देशी व विदेशी दारू टोकन पद्धतीने विकली जाणार आहे. त्यामुळे दारू खरेदीसाठी तळीरामांच्या सकाळपासून लांबच लांब रांगा दिसून आल्या. कित्येक दिवसांनी दारू मिळाल्याने मद्यपींच्या चेहऱ्यावर समाधान दिसले. परंतु, महिलांमध्ये नाराजी आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 24 मार्चपासून अत्यावश्‍यक सेवा वगळता संपूर्ण लॉकडाउन करण्यात आले होते. शासनाने लॉकडाउनमध्ये शिथिलता देऊन 15 मेपासून काही अटींसह दुकाने खुली करण्याची परवानगी दिली. कळमेश्वर-ब्राम्हणी शहरात दारूसह, किराणा, औषधी, जनरल स्टोअर्स, मोबाईल, चप्पल व अन्य दुकाने सुरू झाली. गर्दी होऊ नये यासाठी दारू दुकानांसमोर बांबूचे कठडे लावण्यात आले. शासनाने महसूलवाढीसाठी दारू दुकाने सुरू करण्याची परवानगी दिली असली तरी या निर्णयामुळे महिलांमध्ये नाराजी दिसून येत आहे.

 आधी होता कुख्यात गुंड; आता झाला वाल्याचा वाल्मीकी!


नाश्‍त्याची घरपोच सेवा


लॉकडाउनमुळे हॉटेल, पानटपरी, चहा, दुकाने बंद असले तरी फूटपाथवर नाश्‍ता विक्रेत्यांनी यावर पर्याय शोधत घरीच समोसे, बटाटेवडे, पोहे, चहा आदी पदार्थ बनवून दुकानांमध्ये पोहोचविणे सुरू केले पानटपरी बंद असल्या तरी छुप्या मार्गाने खर्राविक्री सुरूच आहे.

सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा


उमरेड : शहरातील जवळपास सर्वच दुकाने सुरू करण्याचा आदेश जारी केल्यानंतर सकाळी 6 वाजतापासून तळीरामांची दारू दुकानांसमोर गर्दी दिसून आली. एकीकडे धान्यवाटप सुरू असताना स्वतःला गरीब म्हणत धान्य किट मिळविण्यासाठी रांगेत लागणारे आज दारू खरेदीसाठी गर्दी करताना दिसले. इतवारी बाजारपेठेतील मुख्य मार्गावर रांग लावून सकाळपासून ते भरउन्हात दारू खरेदीसाठी नागरिक रस्त्यावर उभे होते. त्यांना नियंत्रित करण्यासाठी पोलिस व नगरपालिका प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागली.
 

जलालखेडा येथील दुकाने सुरू


जलालखेडा : शासनाच्या परवानगीनुसार येथील देशी दारूची दुकाने सुरू करण्यात आली. अंतर ठेवण्यासाठी दोन मीटरवर गोल करण्यात आले. प्रत्येक ग्राहकाचे थर्मल स्क्रीनिंग करण्यात आले. दारू दुकान मालकाने दुकानाबाहेर दोन कर्मचारी उभे ठेवले. दुकानासमोर नियमाचे फलकसुद्धा लावण्यात आले.

go to top