नागपूर विद्यापीठाला तब्बल ५६ कोटींचा फटका; कोरोनामुळे उत्पन्नात घट

loss of 56 crore to Nagpur University due to corona
loss of 56 crore to Nagpur University due to corona

नागपूर ः कोरोना महामारीचा सर्वसामान्य नागरिकाला मोठा फटका बसला. त्याचप्रमाणे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला याचा चांगलाच फटका बसल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठ महिन्यात विद्यापीठाचे उत्पन्न ५६ कोटीने घटले असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकाराने विद्यापीठाच्या आगामी अर्थसंकल्पावर परिणाम होणार असून विकासात्मक योजनांना फटका बसण्याची शक्यता आहे.

राज्यात मार्च महिन्यात टाळेबंदीची घोषणा करण्यात आली. या घोषणेनंतर महाविद्यालय आणि विद्यापीठाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्यात. याशिवाय वसतिगृहेही बंद ठेवण्यात आले. त्यामुळे विद्यापीठाला परीक्षेपासून मिळणारा निधी थांबला. विशेष म्हणजे विद्यापीठाला जवळपास ३५ कोटी रुपये परीक्षा शुल्कातून मिळत असतात. याशिवाय महाविद्यालयांचे संलग्निकरण आणि विलंब शुल्कातूनही पैसे मिळतात. 

याशिवाय, विद्यापीठाला रुसाच्या माध्यमातून निधी मिळत असतो. मात्र, यावर्षी टाळेबंदीमुळे विद्यापीठाच्या परीक्षा लांबल्या. महाविद्यालये बंद असल्याने संलग्निकरणही बंद आहे. याशिवाय परीक्षेचे शुल्क घेऊ नये या मागणीसाठी विद्यार्थी संघटनांनी कुलगुरूंना निवेदने देण्यात आली होती. त्यातूनच कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात आलेले नाही. आता विद्यापीठस्तरावर अंतिम वर्षांची परीक्षा होत असून इतर वर्षाच्या परीक्षा महाविद्यालयस्तरावर घेण्यात येणार आहे. यामुळे विद्यापीठाचा शुल्कापोटी येणारा पैसा मिळणार नसल्याचे चित्र आहे.

विशेष म्हणजे गेल्यावर्षी विद्यापीठाला एप्रिल ते नोव्हेंबरदरम्यान ६१ कोटी ९ लाख ३२ हजार ५५४ रुपये मिळाले होते. मात्र, यावर्षी करोनाचा फटका बसल्याने विद्यापीठाला केवळ ४ कोटी ६५ लाख ५३ हजार ९१२ रुपयाचा निधी मिळाला आहे. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत ५६ कोटी ४३ लाख ७८ हजार ६४२ रुपयाची तुट आहे. याच्या प्रभाव विद्यापीठाच्या विकासात्मक कामावर पडणार असून विविध नव्या प्रकल्पाला निधीअभावी पैसा मिळणार असल्याचे दिसून येणार आहे.

परीक्षा आणि महाविद्यालयाच्या संलग्निकरणातून विद्यापीठाला या काळात पैसे येत असतात. मात्र, करोनामुळे सगळे मार्ग बंद असल्याने ५६ कोटी रुपयाच्या निधी कमी झाल्याचे दिसून येत आहे.
डॉ. राजू हिवसे, 
वित्त व लेखा अधिकारी

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com