esakal | अहोऽऽ हे काय केलं? आता कशाला सोडलं पाणी; तुमच्या चुकीमुळे दिवाळी गेली ना अंधारात
sakal

बोलून बातमी शोधा

Loss of farmer due to negligence of Irrigation Department

पाटबंधारे विभागाच्या निष्काळजीपणाने सकाळपासून कापलेल्या धानातून पाणी वाहत आहे. वाळलेला धान पूर्णपणे ओळ चिंब झाला आहे. पेंच प्रकल्पाच्या पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता प्रकाश देशमुख यांना परिस्थिती जाणून घेण्यास फोन केला असता ते ‘नॉट रिचेबल’ दाखवित होता.

अहोऽऽ हे काय केलं? आता कशाला सोडलं पाणी; तुमच्या चुकीमुळे दिवाळी गेली ना अंधारात

sakal_logo
By
पुरुषोत्तम डोरले

मौदा (जि. नागपूर) : तालुक्यातील सालवा-नानादेवी कालव्याला क्षमतेपेक्षा जास्त पाणी सोडल्यामुळे कुंभापूर येथील शेतकऱ्यांचा सुमारे २० एकरातील धान पूर्णपणे खराब झाला. विभागाच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण नुकसान झाले. शेतकरी पाटबंधारे विभागाला नुकसान भरपाईची मागणी करीत आहेत.

अगोदरच संकटात सापडलेला शेतकरी पाटबंधारे विभागाच्या निष्काळजीपणामुळे पूर्णपणे उद्वस्त झाला आहे. मृग नक्षत्रापासून शेतकरी दुःख झेलत आहे. टोलधाड, अतिवृष्टी, नदीला महापूर, तुडतुडा यामुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे. धान पिकाला लावलेला खर्च निघेल की नाही, याची चिंता वाटत आहे. पीक काही दिवसातच शेतकऱ्यांचा घरात येणार आहे. परंतु, शेतकऱ्यांच्या आनंदावर पाटबंधारे विभागाचे विरजण घातले.

हेही वाचा - पदवीधर निवडणुक: काँग्रसचं ठरलं, भाजपचं अजूनही गुलदस्त्यात; अभिजित वंजारी सोमवारी अर्ज दाखल करणार

पाटबंधारे विभागाच्या निष्काळजीपणाने सकाळपासून कापलेल्या धानातून पाणी वाहत आहे. वाळलेला धान पूर्णपणे ओळ चिंब झाला आहे. पेंच प्रकल्पाच्या पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता प्रकाश देशमुख यांना परिस्थिती जाणून घेण्यास फोन केला असता ते ‘नॉट रिचेबल’ दाखवित होता.

आवश्यकता नसतानाही सोडले पाणी
यावेळेस पिकाला पाण्याची आवश्यकता नाही. पाटबंधारे विभागाच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. याची भरपाई मिळालाच पाहिजे. कन्हानवरून येणाऱ्या सालवा-नानादेवी-कालव्याला क्षमतेपेक्षा जास्त पाणी सोडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. कालवा ज्याठिकाणी तुटलेला आहे, त्याची दुरुस्त करावी व पाणी सोडणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.
- देवेंद्र गोडबोले,
उपजिल्हाप्रमुख शिवसेना

जाणून घ्या - Success story : सोशल मीडियावर स्क्रोलिंग करताना सापडला उद्योगाचा मार्ग, आता महिन्याला कमावतोय लाखो रुपये

योग्य चौकशी करण्यात येईल
परिसरातील शाखा अभियंता देशमुख यांना सूचना देण्यात आली आहे. ते पाहणी करीत आहेत. त्यांना तात्काळ पाणी बंद करण्यासाठी सांगितले आहे. नुकसानीची योग्य चौकशी करण्यात येईल.
- प्रवीण झाडे,
कार्यकारी अभियंता, पेंच प्रकल्प

संपादन - नीलेश डाखोरे

go to top