प्रेयसीच्या खूनप्रकरणी शिक्षा; शिक्षा भोगताना तब्येत झाली खराब, मग...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 जानेवारी 2020

दोन अनोळखींची मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. प्रेयसीचा स्वभाव बोलका असल्यामुळे तिची अनेकांशी ओळख होती. मात्र, प्रियकराने तिच्या चारित्र्यावर संशय घेत खून केला. याप्रकरणी त्याला शिक्षाही झाली. मात्र, शिक्षाभोगत असतानाच प्रियकराची तब्येत खरात झाली. त्याला रुग्णालयात दाखल केले असता मृत्यू झाला. 

नागपूर : प्रेयसीचा बोलका स्वभाव असल्यामुळे सर्वांसोबत सहज पटत होते. त्यामुळे तिची अनेक युवकांसोबत ओळख होती. ती लवकरच कुणाशीही मैत्री करायची. मात्र, ही बाब प्रियकराला पटत नव्हती. तो नेहमी तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. एकेदिवशी याच कारणावरून त्याने तिचा खून केला. त्याला याप्रकरणी शिक्षाही झाली. मात्र, तरुंगात शिक्षा भोगत असताना त्याचा मृत्यू झाला. राज भगवानदास यादव (वय 41, रा. ट्रॅफिक चिर्ल्डन पार्क चौक) असे मृत्यू झालेल्या न्यायाधीन बंदी प्रियकराचे नाव आहे. याप्रकरणी धंतोली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

हेही वाचा - अर्धा एकर जमिनीच्या तुकड्यावर जगावे कसे? उचलले हे पाऊल...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज यादव हा मध्य प्रदेशातील कटनी येथील रहिवासी आहे. प्रेयसी चंद्रकला ही पाटणसावंगी तालुक्‍यातील एका खेड्यातील होती. घटनेच्या काही वर्षांपूर्वी त्यांची ओळख झाली. पूर्वी ते चंद्रकलाच्या गावी राहायचे. मात्र, तिच्या नातेवाइकांनी त्याला मारहाण करून घराबाहेर हाकलून लावले होते. तेव्हापासून ते नागपुरात राहायला आले होते. 

शहरात तो ट्रॅफिक चिल्ड्रेन पार्क परिसरातील सुलभ शौचालयात स्वच्छतेचे काम करायचा. शौचालयाच्या वरती त्यांच्या राहण्याची खोली होती. त्यावर पाण्याची टाकी बनवण्यात आली आहे. घटनेपूर्वी चंद्रकला पायऱ्यांवर पडली व पायाला दुखापत झाली. चंद्रकलाचे कुण्यातरी युवकासोबत प्रेमसंबंध आहेत, असा संशय राजला होता. चंद्रकला बोलक्‍या स्वभावाची असल्यामुळे तिचे अनेकांशी पटत होते. तीच बाब राजला खटकत होती.

काय झालं असावे? - लग्न होऊन झाले सहाच महिने अन्‌ पत्नीने दाखवले 'रूप', मग पतीने घेतला हा निर्णय

एका युवकाशी तिची मैत्रीही झाली होती. दोघांचे संबंध वाढल्याने राजचा पारा चढला होता. त्या युवकाशी बोलू नको, अशी सक्‍त ताकीद राजने चंद्रकलाला दिली होती. तरीही ती त्या युवकाशी बोलणे सोडत नव्हती. याच कारणावरून त्यांच्यात भांडण झाले होते. यावेळी त्याने तिचा गळा आवळून खून केला व मृतदेह पोत्यात भरून पाण्याच्या टाकीत फेकला होता. त्या प्रकरणी राजला अटक करण्यात आली होती. मात्र, त्याचा कारागृहात मृत्यू झाला. याप्रकरणी धंतोली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. 

आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू

राज याने प्रेयसी चंद्रकला हिच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा गळा दाबून खून केल्याचे समजताच पोलिसांनी अटक केली. तेव्हापासून तो कारागृहात असताना 14 जानेवारीला अचानक त्याची प्रकृती बिघडली. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर तिथे उपचार सुरू होता. मात्र, शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lover's death in prison