वर्चस्वाच्या वादातून उपराजधानीत घडला थरार! गुंडानंच केला गुंडाचा गेम; शेषनगरातील घटना

man attacked on man in Nagpur
man attacked on man in Nagpur

नागपूर ः वर्चस्वासाठी धडपडणाऱ्या गुंडांमध्ये धुसफूस सुरू होती. वाद विकोपाला जाऊन एकाने दुसऱ्याची चाकुने घाव घालीत हत्या केली. सोमवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास शेषनगरात ही थरारक घटना घडली. मृतक तडीपार असूनही सर्रासपणे नागपुरात वावरत होता, हे विशेष.

शेख अल्ताफ शेख अशपाक (२६) रा. चिखली, कळमना असे मृताचे तर सलमान खान शमशेर खान (२४) रा. गौसीया कॉलनी असे आरोपीचे नाव आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे दोघेही गुन्हेविश्वात वर्चस्व निर्माण करण्याच्या प्रयत्नात होते. यातुनच त्यांच्यात वारंवार खटके उडत होते. अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असणाऱ्या अलताफविरूद्ध यापूर्वी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली होती. फेब्रुवारी २०२० मध्ये तो कारागृहातून बाहेर आला. परंतु, त्याच्यात कोणताही बदल झाला नाही. गुन्हेगारीतील सक्रीयता वाढतच असल्याने १७ डिसेंबर २०२० रोजी तडीपार करण्यात आले होते. यानंतरही तो नागपुरातच तळ ठोकून होता. 

प्राप्त माहितीनुसार चार दिवसांपूर्वीही अल्ताफ व सलमानचा वाद झाला होता. अल्ताफ सोमवारी हसनबाग परिसरात राहणाऱ्या नातेवाईकांकडे आला होता. तर, सलमानसुद्धा पैसे घेण्यासाठी शेषनगरात राहणाऱ्या वहिनाकडे आला होता. योगायोगाने दुपारी शेषनगर भागात पुन्हा आमोरासमोर आले. बाचाबाची सुरू असतानाच अशफाकचा सोक्षमोक्ष लावण्याच्या निर्धाराने सलमानने चाकू काढला आणि अल्ताफच्या अंगावर धावून गेला. जीव वाचविण्यासाठी तो एका घरात शिरला. सलमान ही त्याच्या मागे धावला. 

घरात घुसून त्याच्यावर घाव घातले. अल्ताफ रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळताच आरोपी फरार झाला. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक किशोर पर्वते पथकासह घटनास्थळावर पोहोचले. पोलिस उपायुक्त डॉ. अक्षय शिंदे यांनीही घटनास्थळाचा आढावा घेतला. तात्काळ डीबी पथकाने आरोपी सलमानचा शोध सुरू केला. पोलिसांनी त्याला ताजबाग परिसरातून अटक केली.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com