esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

man attempt to murder sister friend in nagpur crime news

अक्षय वानखडे याचे गिट्टीखदानमध्ये राहणाऱ्या रिया (काल्पनिक नाव) हिच्यासोबत गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. त्यांच्या प्रेमसंबंधाची चर्चा वस्तीत असल्यामुळे त्याची कुणकुण रियाच्या घरापर्यंत पोहोचली.

बहिण प्रियकराला भेटायला गेली, भावाला माहिती मिळाली अन् घडला अंगावर काटा आणणारा थरार

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : बहिणीसोबत असलेले प्रेमसंबंध तोडण्यासाठी प्रियकरावर भाऊ दबाव टाकत होता. मात्र, प्रियकर युवकाने संबंध तोडण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या भावाने त्या युवकाच्या पोटात चाकू भोसकून खून करण्याचा प्रयत्न केला. ही थरारक घटना बुधवारी रात्री नऊ वाजता केटीनगर गार्डनजवळ घडली. अक्षय दिलीप वानखडे (२७, बोरगाव), असे जखमी प्रियकराचे नाव असून त्याच्यावर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालायत उपचार सुरू आहेत. 

हेही वाचा - मुला-मुलीचं लग्नही पाहता आलं नाही; पोट भरण्यासाठी...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय वानखडे याचे गिट्टीखदानमध्ये राहणाऱ्या रिया (काल्पनिक नाव) हिच्यासोबत गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. त्यांच्या प्रेमसंबंधाची चर्चा वस्तीत असल्यामुळे त्याची कुणकुण रियाच्या घरापर्यंत पोहोचली. त्यामुळे तिच्या आई आणि भाऊ सागरने तिला जाब विचारला. तिने स्वतःला वाचविण्यासाठी 'तो मुलगाच माझ्या मागे लागला...मी त्याच्यावर प्रेम करीत नाही.' असे सांगितले. त्यामुळे सागरने थेट त्या मुलाला फोन केला आणि त्याच्या घराजवळ जाऊन बहिणीचा नाद सोड आणि पुन्हा मागे लागू नको, असे बजावले. त्यानंतर काही दिवस त्यांच्या भेटी-गाठी बंद झाल्या. मात्र, विरह सहन न झाल्यामुळे त्यांनी एकमेकांची भेट घेत पुन्हा प्रेमसंबंध प्रस्थापित केले.

हेही वाचा - वर-वधू मंडपात उभे झाले, डोक्यावर अक्षता पडणार इतक्यात काही जण धडकले अन् उडाला थरकाप

बुधवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास केटी गार्डनजवळ रियाला भेटायला बोलावले. दोघांचीही भेट झाली. बहिण प्रियकरासोबत गार्डनमध्ये बसून असल्याची माहिती एका युवकाने सागरला दिली. त्याने लगेच एका मित्राला सोबत घेतले आणि गार्डनमध्ये पोहोचला. अंधारात ते दोघेही लपून बसले होते. सागरने दोघांचा शोध घेतला. त्यानंतर दोघांत बाचाबाची झाली. 'तू माझ्या बहिणीला भेटलाच कसा' असा जाब विचारला. अक्षयनेही त्याला प्रेमसंबध असून आम्ही लग्न करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर चिडलेल्या सागरने पाठीमागे लपविलेला चाकू काढला आणि थेट अक्षयवर हल्ला केला. धारदार चाकू अक्षयच्या पोटात भोसकला. रस्त्यावरील नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेतली आणि सागरच्या हातातील चाकू हिसकला. त्यामुळे अक्षयचा जीव वाचला. जखमी अक्षयवर मेयोत अपचार सुरू असून तो जीवनमृत्यूशी संघर्ष करीत आहे. या प्रकरणी अक्षयच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सागरला अटक केली. 

go to top