
अंब्रेश्वर (२८) असे थोडक्यात बचावलेल्या युवकाचे नाव सांगितले जाते. तो झारखंडचा राहणारा असल्याची माहिती पुढे आली आहे. प्राप्त माहितीनुसार तो ०२८११ लोकमान्य टिळक टर्मिनस- हटिया एक्स्प्रेसमधून प्रवास करीत होता.
नागपूर ः जीवनाचा कंटाळा आला, जगायचे नाही, असे काहीतरी बरळत आत्महत्येच्या निर्धाराने एक युवक रेल्वेडब्याच्या छतावर चढला. संभाव्य धोका ओळखून प्रवाशांनी आरडाओरड सुरू केली. यामुळे तिथे असणारे रेल्वे कर्मचारी, पोलिस, आरपीएफ जवानांचे लक्ष वेधले गेले. त्यांनी लागलीच नियंत्रण कक्षाला धोक्याची सूचना दिली. त्याचवेळी युवक गाडीच्या डब्यावर चढलाच. त्यानंतर जे घडलं ते बघून उपस्थितांच्या अंगावर काटा आला.
अंब्रेश्वर (२८) असे थोडक्यात बचावलेल्या युवकाचे नाव सांगितले जाते. तो झारखंडचा राहणारा असल्याची माहिती पुढे आली आहे. प्राप्त माहितीनुसार तो ०२८११ लोकमान्य टिळक टर्मिनस- हटिया एक्स्प्रेसमधून प्रवास करीत होता. ही गाडी नियोजित वेळेआधीच नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक १ वर येऊन थांबली. ती दुपारी १.४० वाजता पुढील प्रवासाला रवाना होणार होती. यामुळे प्रवासी पाणी आणि खाद्य पदार्थ खरेदीत व्यस्त होते.
काही विपरित घडण्यापूर्वीच ओएचईचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. यामुळे अगदी थोडक्यात त्याचे प्राण वाचले. यानंतर रेल्वे कर्मचारी, आरपीएफ जवान, लोहमार्ग पोलिसांनी कसेबसे विक्षिप्ताप्रामाणे वागणाऱ्या या युवकाला खाली उतरविले. रविवारी दुपारी नागपूर रेल्वे स्थानकावर हा थरारक घटनाक्रम घडला. अनेकांनी मोबाईलवरून या घटनेचे चित्रीकरण केले आणि अल्पावधीतच ते व्हायरलही झाले.
दैव बलवत्तर म्हणून....
एस-२ आणि एस-३ डब्यावर इकडून तिकडे फिरत होता. त्याचे वागणे विक्षिप्तप्रामाणे होते. जीवनाचा कंटाळा आला असून जगायचे नसल्याचे सांगून तो ओएचईला स्पर्श करण्याचा इशारा देत होता. सुदैवाने त्याने स्पर्श मात्र केला नाही. अनेकांनी त्याला खाली उतरण्याची विनंती केली. पण, तो एकत नव्हता. अखेर काहींनी बोलण्यात व्यस्त करीत इतरांनी त्याला त्याला काली ओढून घेतले आणि टांगणीला लागलेला साऱ्यांचाच जीव भांड्यात पडला. युवकाला आरपीएफ ठाण्यात आणून त्याची चौकशी करण्यात आली. पण, तो दरवेळी वेगवेगळी उत्तरे देत होता. नेमका कुठून येत होता, याबाबतही स्पष्ट माहिती त्याने दिली नाही.
गतवर्षीच्या घटनेला उजाळा
आजच्या घटनेने गतवर्षी ८ डिसेंबर रोजी घडलेल्या थराराच्या आठवणी पुन्हा ताज्या केल्या. ओरीसाच्या काटाभांजी येथील रहिवासी बिरबल कुथ्थू पहारिया (२५) व ज्ञानदेवी (१९) यांनी पळून जाऊन प्रेमविवाह केला होता. सोबत आणलेले पैसे संपले. पोट भरणेही कठीण झाले. यातून दोघांनीही आत्महत्येचा निर्णय घेतला होता. दोघेही आत्महत्येसाठी छतावर चढले. बिरबलने ओएचईला हात लावल्याने गंभीरिरत्या होरपळून त्याचा मृत्यू झाला. तर त्याच्या पत्नीला ऑटोचालक- कुलींसह इतरांनी ऐनवेळी खाली खेचून घेतल्याने ती थोडक्यात बचावली होती.
संपादन - अथर्व महांकाळ