esakal | 'मी वर गेल्यावर खुश राहतो', तरुणानं चिठ्ठी लिहित केली आत्महत्या

बोलून बातमी शोधा

man committed to suicide in nagpur

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेश शेवारे हे बँकेचे डेली कलेक्शनचे काम करायचे. रविवारी त्यांच्या पत्नी नातेवाइकाकडे गेल्या. नरेश हे घरी एकटेच होते. नरेश यांनी पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला. नरेश यांच्या पत्नीने त्यांना फोन केला.

'मी वर गेल्यावर खुश राहतो', तरुणानं चिठ्ठी लिहित केली आत्महत्या
sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : कोरोनामुळे हातात खेळणारा पैसा कमी झाला. त्यामुळे घरातील गरजा पूर्ण करण्यासाठी लोकांकडून कर्ज घेतले. ते फेडण्यासाठी गाडी विकली. परंतु, अजूनही कर्ज फेडणे बाकी असल्यामुळे एका युवकाने घरात घळफास घेऊन आत्महत्या केली. नरेश बाळकृष्ण शेवारे (४१, मानवटकर ले-आऊट, महादुला) असे मृताचे नाव आहे. 

हेही वाचा - सोयाबीनची वाटचाल सात हजारांकडे; लाभ मात्र व्यापाऱ्यांनाच, शेतकऱ्यांचे खिसे रिकामेच

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेश शेवारे हे बँकेचे डेली कलेक्शनचे काम करायचे. रविवारी त्यांच्या पत्नी नातेवाइकाकडे गेल्या. नरेश हे घरी एकटेच होते. नरेश यांनी पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला. नरेश यांच्या पत्नीने त्यांना फोन केला. त्यांचा प्रतिसाद मिळाला नाही. नरेश यांच्या पत्नीने पुतण्याच्या मोबाइलवर फोन करून घरी जाण्यास सांगितले. त्यांचा पुतण्या घरी गेला असता नरेश हे गळफास लावलेले दिसले. शेजाऱ्याच्या मदतीने त्याने फास काढला. नरेश यांना मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी नरेश यांनी आत्महत्ये पूर्वी लिहिलेली चिठ्ठी जप्त केली. 'मी वर गेल्यावर खुश राहतो, तुम्ही सर्व खाली सुखी राहा.' असे चिठ्‍ठीत लिहिले आहे. आर्थिक कोंडी निर्माण झाल्यामुळे नरेश यांनी आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. कोराडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.