esakal | सोयाबीनची वाटचाल सात हजारांकडे; लाभ मात्र व्यापाऱ्यांनाच, शेतकऱ्यांचे खिसे रिकामेच

बोलून बातमी शोधा

Rates of Soyabeen are over 7 thousand but farmers not getting enough money

फेब्रुवारीच्या अखेरीपासून सोयाबीनचे दर वाढण्यास सुरूवात झाली. मार्चमध्ये सहा हजाराचा पल्ला सोयाबीनने गाठला. तर, नवीन हंगामाची चाहूल लागली असताना व शेतकरी या हंगामाच्या तयारीस लागला असताना सोयाबीनचे दर 6 हजार 400 रुपयांवर पोहोचले आहेत.

सोयाबीनची वाटचाल सात हजारांकडे; लाभ मात्र व्यापाऱ्यांनाच, शेतकऱ्यांचे खिसे रिकामेच
sakal_logo
By
कृष्णा लोखंडे

अमरावती ः खरीप हंगामातील मुख्य पीक ठरलेल्या सोयाबीनचे दर सध्या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. साडेसहा हजार रुपयांपर्यंत दर मिळू लागला असून सात हजाराकडे वाटचाल सुरू झाली आहे. आगामी पंधरवाडयात सात हजाराचा पल्ला गाठण्याची शक्‍यता व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे.

फेब्रुवारीच्या अखेरीपासून सोयाबीनचे दर वाढण्यास सुरूवात झाली. मार्चमध्ये सहा हजाराचा पल्ला सोयाबीनने गाठला. तर, नवीन हंगामाची चाहूल लागली असताना व शेतकरी या हंगामाच्या तयारीस लागला असताना सोयाबीनचे दर 6 हजार 400 रुपयांवर पोहोचले आहेत.

भयंकर प्रकार! कोरोनाचे अर्धवट जळालेले मृतदेह कुत्र्यांनी आणले गावात; भंडाऱ्यातील ...

शुक्रवारी (ता.9) अमरावती बाजार समितीत सुपर दर्जाच्या सोयाबीनला 5800 ते 6400 रुपये भाव मिळाला. त्याच्या एक दिवस अगोदर 6200 रुपये कमाल भाव होता. आवक मात्र दोन्ही दिवशी चार हजार पोत्यांपेक्षाही कमी होती. अशीच स्थिती जिल्ह्यातील इतर बाजार समितीतही आहे. बाजारातील सोयाबीनची आवक बघता हा शेतकऱ्यांचा आहे का? असा प्रश्‍न आहे. 

एप्रिल महिन्यात साधारणतः बियाण्यांसाठी बाजारात विक्रीसाठी आणल्या जातो. हा सोयाबीन अडते व व्यापाऱ्यांनी आणला आहे, हे स्पष्ट आहे. गत हंगामात अवकाळी पाऊस व नंतर परतीच्या पावसाने कापणी झालेल्या सोयाबीनवर आघात केल्याने उत्पादनाची सरासरीसोबतच दर्जाही घसरला. त्यामुळे या हंगामात उच्च दर्जाच्या सोयाबीन बियाण्यांचा वानवा जाणवणार आहे. 

बियाणे बाजारात चढे दर राहण्याची शक्‍यता कृषी तज्ज्ञांनी वर्तविली आहे. ही शक्‍यता लक्षात घेत सद्या खुल्या बाजारात चढ्या दरांनी सोयाबीन विकल्या जात आहे. शेतकऱ्यांनी हंगामाच्या सुरूवातीलाच सोयाबीन मिळेल त्या भावात विकले आहे.

हृदयद्रावक! शेतात काम करताना महिलांना अचानक दिसला तार...

आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणीचा दाखला

75 टक्के शेतकऱ्यांकडील सोयाबीन आधीच संपले असताना या महिन्यात सोयाबीनचे चढे दर भुवया उंचावणारे ठरू लागले आहे. या चढ्या दरांचा लाभ व्यापाऱ्यांना अधिक होत असल्याचे वास्तव आहे. शेतकऱ्यांकडूनच कमी दरात घेतलेले सोयाबीन ते दर चढवून विकत आहेत. त्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणीचा दाखला देण्यात येत असला तरी त्यामध्ये फार दम नसल्याचे खरेदीदारांनीच म्हटले आहे.

संपादन - अथर्व महांकाळ