esakal | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट; उपराजधानीत युवकाला अटक
sakal

बोलून बातमी शोधा

nana patole

कृणाल याने २७ फेब्रुवारीला नाना पटोले यांच्याविरुद्ध फेसबुक व अन्य सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली. काँग्रेस कार्यकर्ते आकाश पितांबर तायवाडे (वय ३१ रा. गोपालनगर) यांनी प्रतापनगर पोलिसांत तक्रार दिली. 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट; उपराजधानीत युवकाला अटक

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर ः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार आणि माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याविरुद्ध सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकाला प्रतापनगर पोलिसांनी अटक केली. कृणाल मोहनराव दहिवाले (वय ३४ रा. नाईक रोड,महाल),असे अटकेतील युवकाचे नाव आहे. 

नागरिकांनो सावधान! हवामान खात्यानं दिला धोक्याचा इशारा; प्रचंड तापमानवाढीचे संकेत

कृणाल याने २७ फेब्रुवारीला नाना पटोले यांच्याविरुद्ध फेसबुक व अन्य सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली. काँग्रेस कार्यकर्ते आकाश पितांबर तायवाडे (वय ३१ रा. गोपालनगर) यांनी प्रतापनगर पोलिसांत तक्रार दिली. 

पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. पोलिस उपायुक्त नुरूल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतापनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर ठोसरे यांच्या पोलिस निरीक्षक व्ही.बी.जाधव, उपनिरीक्षक व्ही.बी.पवार, हवालदार चंद्रमणी सोमकुवर, मनोज निमजे, मिलिंदकुमार मेश्राम, विशाल घुगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शोध घेऊन कृणाल याला अटक केली. 

तस्करांची अजब शक्कल! पेयजलाच्या बाटल्यांमधून मोहाच्या दारूची सर्रास तस्करी

पोलिसांनी त्याला सोमवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली. कृणाल हा सौंदर्य प्रसाधानाच्या एजन्सीत प्रतिनिधी आहे. तो कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही,असे पोलिसांनी स्पष्ट केले.