esakal | नागरिकांनो सावधान! हवामान खात्यानं दिला धोक्याचा इशारा; प्रचंड तापमानवाढीचे संकेत
sakal

बोलून बातमी शोधा

abc

उन्हाळा विदर्भात दरवर्षी चांगलाच तापतो, असा अनुभव आहे. मार्च महिन्याच्या प्रारंभीच विदर्भातील  चंद्रपूर व अकोला येथे सर्वाधिक तापमान नोंदविण्यात आले. चंद्रपूर येथे 39.4 अंश तर अकोल्यात 39.1 अंश तापमानाची नोंद आहे.

नागरिकांनो सावधान! हवामान खात्यानं दिला धोक्याचा इशारा; प्रचंड तापमानवाढीचे संकेत

sakal_logo
By
सुरेंद्र चापोरकर

अमरावती ः उन्हाळ्यातील तापमानात आता वाढ होऊ लागली असून जमिनीतील आर्द्रता झपाट्याने कमी होऊ लागली आहे. भूजल पातळीही घसरू लागली आहे. येत्या आठवड्यात तापमान 38 अंशावर जाण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. अशातच पश्‍चिम विदर्भातील भूजल पातळीत होत असलेली घट चिंता वाढविणारी आहे.

उन्हाळा विदर्भात दरवर्षी चांगलाच तापतो, असा अनुभव आहे. मार्च महिन्याच्या प्रारंभीच विदर्भातील  चंद्रपूर व अकोला येथे सर्वाधिक तापमान नोंदविण्यात आले. चंद्रपूर येथे 39.4 अंश तर अकोल्यात 39.1 अंश तापमानाची नोंद आहे. अमरावती, बुलडाणा, गडचिरोली, यवतमाळ व नागपूरचे तापमान 37 अंशांपर्यंत राहिले आहे. 

Maharashtra Budget 2021 : गोसेखुर्दसाठी एक हजार कोटी

वर्ध्यात पारा 38 अंशांवर होता. प्रादेशिक हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार 6 ते 11 मार्च यादरम्यान आकाश निरभ्र राहील. हवामान कोरडे व कमाल तापमान 38 ते 38.8 अंश तर किमान तापमान 17.5 ते 19.5 अंश राहण्याचा अंदाज आहे.

वाढत्या तापमानाबरोबरच भूजल पातळीतही घट नोंदविण्यात आली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाकडून प्राप्त अहवालानुसार अमरावती विभागातील 56 तालुक्‍यांपैकी 14 तालुक्‍यांत भूजल पातळीत घट नोंदविण्यात आली आहे. यामध्ये एक मीटरपर्यंत घट झालेल्या 13 व दोन मीटरपर्यंत घट झालेल्या तालुक्‍यांची संख्या एक आहे. त्याचवेळी 42 तालुक्‍यांतील भूजल पातळीत वाढही नोंदविण्यात आली आहे. एक मीटरपर्यंत 33 व दोन मीटरपर्यंत नऊ तालुक्‍यांत वाढ झाली आहे.

या तालुक्‍यांमध्ये झाली घट

भूजल पातळीत घट झालेल्या तालुक्‍यांमध्ये अकोट, तेल्हारा, बुलडाणा, मेहकर, मोताळा, शेगाव, यवतमाळ, बाभूळगाव, कळंब, आर्णी, महागाव, राळेगाव, वणी व मारेगाव या तालुक्‍यांचा समावेश आहे.

चित्रा वाघ यांची बदनामी : मुंबई पोलिसांनी यवतमाळात...

42 तालुक्‍यांत वाढ

अमरावती विभागातील 56 पैकी 42 तालुक्‍यांत भूजल पातळीत वाढ नोंदविण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यातील 14, अकोला जिल्ह्यातील पाच, वाशीममधील सहा, बुलडाण्यातील नऊ व यवतमाळमधील आठ तालुक्‍यांचा समावेश आहे. या तालुक्‍यांतील भूजलाचे व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image