
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नानक उर्फ बाळू यादव हा सिव्हिल इंजिनिअर आहे. त्याला तीन मुले आणि पत्नी आहे. त्याच्या घराशेजारी पिडित महिला आरती (बदललेले नाव) राहते. ती विवाहित असून तिला १९ वर्षाची मुलगी आहे.
नागपूर ः अभियंत्याने वस्तीत राहणाऱ्या विवाहित महिलेला पिस्तूलाचा धाक दाखवून बलात्कार केला. महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित करताना मोबाईलने अश्लील व्हिडिओ आणि फोटो काढले. अश्लील फोटो सोशल मिडियावर व्हायरल करून तिच्या मुलीला शारीरिक संबंधासाठी दबाव टाकला. या प्रकरणी कपिलनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. नानक उर्फ बाळू लालताप्रसाद यादव (४३, रा. रमाईनगर, प्लॉट क्र. १०, दुर्गा मंदिरजवळ, कपिलनगर) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नानक उर्फ बाळू यादव हा सिव्हिल इंजिनिअर आहे. त्याला तीन मुले आणि पत्नी आहे. त्याच्या घराशेजारी पिडित महिला आरती (बदललेले नाव) राहते. ती विवाहित असून तिला १९ वर्षाची मुलगी आहे. धनाढ्य असलेल्या नानकने विवाहित आरतीशी संपर्क वाढवला. तिच्याशी सलगी केली. तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.
नक्की वाचा - जन्मदाता बापच करत होता घृणास्पद कृत्य; अखेर दिरानं उचलला विडा अन् घडला थरार
तिला मोठमोठी स्वप्न दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पत्नी घरी नसल्याची संधी साधून तो आरतीला घरी बोलवत होता. तिला शारीरिक संबंधासाठी दबाव टाकत होता. गेल्या तीन वर्षांपासून त्या दोघांचे प्रेमसंबंध होते. मात्र, बाळूच्या स्वभावात अचानक बदल झाला. त्याने आरतीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करताना मोबाईलने तिचे नग्न फोटो आणि व्हिडिओ काढले. तो वारंवार तिचे अश्लील फोटो काढायला लागला. त्याचे वागणे बघून ती त्याला टाळू लागली. त्यामुळे चिडलेला बाळू तिच्यावर दबाव टाकायला लागला. ४ जानेवारीला त्याने आरतीला घरी बोलावले. तिने त्याच्या घरी येण्यास आणि प्रेमसंबंध कायम ठेवण्यास नकार दिला. त्यामुळे तो तिच्या घरी गेला. तिच्या डोक्याला पिस्टल लावून जीवे मारण्याची धमकी दिली आणि बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
मुलीशी संबंधाची मागणी
आरतीला १८ वर्षाची मुलगी असून ती शिक्षण घेत आहे. बाळूची वाईट नजर तिच्यावर होती. मुलीशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तिला मानसिकरित्या तयार करण्यासाठी तो आरतीवर दबाव टाकायला लागला. तिने स्पष्टपणे नकार दिला. त्यामुळे त्याने सर्व अश्लील फोटो सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. या धमकीमुळे आरती नैराश्यात गेली.
जाणून घ्या - १८ वर्ष होवूनही झालं नाही बाळ, पती घरी येताच पत्नी मोठ्यानं किंचाळली अन् घडला थरार
सोशल मिडियावर व्हिडीओ व्हायरल
आरतीने शारीरिक संबंध ठेवण्यास आणि मुलीला तयार न केल्यामुळे चिडलेल्या बाळू यादवने आरतीचे अश्लील व्हीडिओ आणि फोटो सोशल मिडियावर व्हायरल केले. तसेच तिच्यासोबत फोनवरून साधलेला अश्लील संवादाचे रेकॉर्डींगसुद्धा व्हायरल केले. त्यामुळे वस्तीतील अनेक जणांनी तिला विचारणा केली. बदनामी झाल्यामुळे आरतीने कपीलनगर पोलिस ठाण्यात बाळू यादव विरूद्ध तक्रार दिली.
संपादन - अथर्व महांकाळ