esakal | दाऊदचा फोन हॅक करणारा मनीष भंगाळेने आमदार कृष्णा खोपडेंना पाठवले पत्र, काय असावे कारण...
sakal

बोलून बातमी शोधा

Manish Bhangale sent a letter to MLA Krishna Khopade

आता मनीषने आमदार कृष्णा खोपडे यांना एक पत्र पाठवले आहे. पत्रात तुमचे व तुमच्याशी संबंधित असलेल्यांच्या फोनचा सीडीआर काढला जात आहे. संभाषण रेकॉर्डिंग केले जात आहे, असे म्हटले आहे. तसेच सावध राहण्याचा इशाराही दिला आहे. कृष्णा खोपडे यांनी सोमवारी लकडगंज पोलिस ठाण्यात पत्र सादर करून तक्रार नोंदवली आहे. 

दाऊदचा फोन हॅक करणारा मनीष भंगाळेने आमदार कृष्णा खोपडेंना पाठवले पत्र, काय असावे कारण...

sakal_logo
By
राजेश चरपे

नागपूर : कुख्यात गुंड दाऊद इब्राहीम याचा फोन हॅक केल्याचा दावा करणाऱ्या हॅकरने एक पत्र आमदार कृष्णा खोपडे यांना टपालाद्वारे पाठविले आहे. कृष्णा खोपडे यांना शनिवारी हे पत्र त्यांच्या कार्यालयाच्या पत्त्यावर प्राप्त झाले आहे. पत्र पाठवणाऱ्याने आपले नाव उघड करू नये, अशी विनंती केली असली तरी नावासह आपली स्वाक्षरीसुद्धा केली आहे, यामुळे आश्‍चर्य व्यक्‍त करण्यात येत आहे. 

राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे दाऊदशी संबंध असल्याचा आरोप करून मनीष भंगाळे याने खळबळ उडवून दिली होती. मनीषने इथिकल हॅकर्सने दाऊदचे कॉल ट्रेस केल्याचा दावा केला होता. दाऊदने कोणा-कोणाला कॉल केले होते, याची माहिती त्याने काढली होती. दाऊदच्या कॉल लिस्टमध्ये त्याला मिळालेल्या एकूण चार मोबाइल क्रमांकांमध्ये एक नंबर एकनाथ खडसे यांचा असल्याचे म्हटले होते. यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या.

जाणून घ्या - 'नको त्या अवस्थेत' सापडलेल्या पत्नी व प्रियकराचा खून

आता मनीषने आमदार कृष्णा खोपडे यांना एक पत्र पाठवले आहे. पत्रात तुमचे व तुमच्याशी संबंधित असलेल्यांच्या फोनचा सीडीआर काढला जात आहे. संभाषण रेकॉर्डिंग केले जात आहे, असे म्हटले आहे. तसेच सावध राहण्याचा इशाराही दिला आहे. कृष्णा खोपडे यांनी सोमवारी लकडगंज पोलिस ठाण्यात पत्र सादर करून तक्रार नोंदवली आहे. 

ही दिली आहे ओळख

मनीष भंगाळेने पत्र टाईप केले आहे. स्वाक्षरी करणाऱ्याने मनीष भंगाळे असे नाव पत्राखाली लिहिले आहे. आपली ओळख सायबर हॅकर, दाऊद इब्राहीम कासकर, रा. कराची, पाकिस्तान याचा सीडीआर काढणारा अशी दिली आहे.

काय आहे या पत्रात

पत्राच्यावर सावधानतेचे निवेदन असे शिर्षक दिले आहे. आपले, आपल्या कुटुंबीयाचे, मित्र मंडळी, आपले नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मोबाईल फोनचे विरोधक, शत्रु मार्फत सीडीआर काढले जात आहे. आपले मोबाईल ट्रॅकवर ठेवले असून, संभाषण रेकॉर्ड केले जात आहे. त्याच्याप्रमाणे आपल्याकडे लॅंड लाईनचेही सीडीआर काढले जात आहे. विरोधकांनी या कामी पोलिसांची मदत घेतली आहे. ज्यांच्याकडे हे काम सोपविले आहे ते पोलिस पैसे मिळतात म्हणून हे घृणास्पद कार्य करीत आहे, असे पत्रात म्हटले आहे.

ठळक बातमी - व्वा रे पठ्ठे... मजूर मिळत नसल्याने तण काढण्यासाठी शेतकऱ्याने लढवली ही शक्‍कल...

सोबत दिला मोबाईल क्रमांक

कुख्यात गुंड दाऊद इब्राहीम याचा फोन हॅक केल्याचा दावा करणाऱ्या हॅकरने पत्र आमदार कृष्णा खोपडे यांना टपालाद्वारे पाठविले आहे. या पत्रात मुंबई, पुणे, ठाणे या भागातील काही पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावेसुद्धा त्याने नमूद केली आहेत. आपले नाव उघड करू नये, अशी विनंती केली असली तरी नावासह स्वाक्षरीसुद्धा केली आहे. तसेच संभाषण रेकॉर्ड होत आहे याची अधिक माहिती हवी असेल तर एक मोबाईल नंबरसुद्धा दिला आहे. 

संपादन - नीलेश डाखोरे