'नको त्या अवस्थेत' सापडलेल्या पत्नी व प्रियकराचा खून 

Husband murdered his wife & her boyfriend
Husband murdered his wife & her boyfriend

नागपूर : दारू पिल्यानंतर झोपी गेलेला पती रात्री दोन वाजता अचानक झोपेतून उठला. बेडवर पत्नी दिसली नाही. त्यामुळे तिचा शोध घेत असताना ती बालकनीत तिच्या प्रियकरासोबत "नको त्या अवस्थेत' दिसली. डोक्‍याचा भुगा झाल्याने पतीने पत्नी व तिच्या प्रियकराचा कुऱ्हाडीने खात्मा केला. किरण कुवरलाल बरमैया (वय 29) आणि शिवा असे खून झालेल्या प्रियकर-प्रेयसीचे नाव आहे. तर कुंवरलाल भारत बरमैया (40 रा. कल्याणेश्‍वर नगर) असे आरोपी पतीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली असून रक्ताने माखलेली कुऱ्हाड पोलिसांनी जप्त केली आहे. ही थरारक घटना अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कल्याणेश्‍वरनगर परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पतीला पोलिसांनी अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंवरलाल बरमैया मूळचा छत्तीसगढमधील रहिवासी असून, कामाच्या शोधात नागपुरात आला होता. तो पत्नी किरणसह कल्याणेश्‍वर नगरात भाड्याने राहत होता. बांधकाम मिस्त्री असलेल्या कुंवरलालच्या हाताखाली शिवा कुमार (वय 26) हा युवक मजूर म्हणून काम करीत होता. कुंवरलाल आणि शिवा या दोघांनाही दारूचे व्यसन होते. कुंवर शिवाला घरी दारू पिण्यासाठी बोलवीत होता. दरम्यान कुंवरची पत्नी किरणशी शिवाची ओळख झाली. पती कुंवरसोबत किरणही दारू पित होती. दारू पिण्यासाठी नेहमी येणाऱ्या शिवाची नजर किरणवर पडली. दोघांची मैत्री झाली. 

पतीपासून मूल होत नसल्याने किरणनेही शिवासोबत मैत्री ठेवली. दोघांच्या वारंवार होणाऱ्या भेटीतून दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यामुळे शिवा वारंवार घरी यायला लागला. रविवारी कुंवरने दारू आणि मटनाचा बेत आखला. त्यामुळे शिवाला पार्टीसाठी आमंत्रण देण्यात आले. कुंवर, किरण आणि शिवा यांनी दारू ढोसली आणि जेवण केले. कुवर आणि किरण झोपायला निघून गेले तर शिवाला बाल्कनीत झोपण्यास सांगितले. 
 

पत्नी दिसली प्रियकराच्या बाहुपाशात 


शिवा आणि किरणच्या नेहमीच्या प्लाननुसार पती कुंवरला जास्त दारू पाजली. त्यामुळे लवकरच तो झोपी गेला. मध्यरात्रीच्या सुमारास पत्नी किरण शिवाच्या बेडवर झोपायला गेली. दोन वाजताच्या सुमारास कुंवरला जाग आली. पत्नी बेडवरून बेपत्ता दिसली. तिचा शोध घेतला. ती चक्‍क शिवासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करताना आढळली. त्यामुळे पती कुंवरचा पारा चढला. 
 

असा केला खात्मा 


पत्नी किरण आणि प्रियकर शिवा हे दोघेही नको त्या अवस्थेत दिसल्यानंतर पती कुंवरने शिवाच्या कमरेत लाथ घातली. घराच्या कोपऱ्यात पडलेली कुऱ्हाड घेतली आणि त्याला डोक्‍यावर आणि मानेवार सपासप वार केले. त्यामुळे शिवाचा जागीच मुडदा पडला. त्यानंतर कुंवरने विवस्त्र असलेल्या पत्नीच्या छातीवर कुऱ्हाडीचे घाव घालून तिचाही खात्मा केला. 
 

अशी आली घटना उघडकीस

 
आज सोमवारी पहाटेच्या सुमारास शेजाऱ्यांना रक्‍ताचा सडा दिसला. अजनीचे ठाणेदार प्रदीप रायण्णावार लगेच ताफ्यासह पोहचले. त्यांनी आरोपी कुंवरला ताब्यात घेतले तर दुहेरी हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला. प्रियकरासोबतचे अनैतिक संबंध तसेच शारीरिक संबंध प्रस्थापित करताना आढळल्यामुळे क्षणिक रागातून शिवा आणि किरणचा खून करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. 

हत्याकांडात "लव्ह ट्रॅंगल' 


तीन मुलांचा बाप असलेल्या कुंवरलालची ओळख विवाहित असलेल्या किरणशी झाली. किरणलाही दोन मुले आहेत. दोघांनी अनैतिक संबंध ठेवले. आपापल्या संसारावर पाणी सोडून छत्तीसगढवरून हे दोघेही पळून नागपुरात आले. गेल्या चार वर्षांपासून ते दोघेही "लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहत होते. कुंवर हा लग्नाचा पती नसल्याने किरणने शिवाशी अनैतिक संबंध ठेवले होते, अशी माहिती आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com