आनंदवार्ता... लॉकडाऊनमुळे अनेक जण व्यसनमुक्तीच्या वाटेवर

Many are on the way of Detoxification due to lockdown
Many are on the way of Detoxification due to lockdown

नागपूर : लॉकडाऊनमुळे एकीकडे दारूची दुकाने, पानटपऱ्या बंद असून पोलिसांच्या भीतीने घरातून बाहेर पडणे कठीण आहे. त्यामुळे अनेक जण घरीच असून, यातील काही व्यसनमुक्तीच्या वाटेवर आहेत. विशेष म्हणजे दिवसभर घरीच असल्याने कुटुंबीयांकडूनही व्यसन सोडण्यासाठी पाठिंबा मिळत आहे. खासगी प्रतिष्ठानांमध्ये काम करणाऱ्यांचे खिसे रिते असल्याने व्यसन न परडवणारे आहे. मात्र, व्यसनाधीनतेच्या आहारी गेलेल्यांचा "जुगाड'ही सुरू आहे.

लॉकडाऊनमुळे शहरातील दारूची दुकाने, बार बंद आहेत. संचारबंदी असूनही अनेक ठिकाणी दारू मिळते. परंतु, दारूचे दर सामान्यांच्या आवाक्‍याबाहेर आहेत. त्यामुळे गेल्या चाळीस दिवसांत अनेकांना दारूकडे पाहताही आले नाही. यात प्रामुख्याने खासगी प्रतिष्ठान, संस्थांमध्ये काम करणाऱ्यांचा समावेश आहे.

काही दुकानदार कर्मचाऱ्यांना वेतन देत नाही. संस्थांनीही वेतनात कपात केली. अशा परिस्थितीत त्यांना दारूचे व्यसन न परवडणारे आहे. परंतु, सर्वांचीच दारू सुटेल, असे नाही, असे साहस व्यसनमुक्ती केंद्राचे विजय शेंडे यांनी नमूद केले. दारूच्या आहारी गेलेले काही ना काही उपाय शोधत आहे. त्यांचीही दारू सुटण्याची शक्‍यता आहे. परंतु यासाठी डॉक्‍टर, समुपदेशक यांचा सल्ला तसेच कुटुंबीयांचा पाठिंबा आवश्‍यक असल्याचे शेंडे म्हणाले.

दारूप्रमाणेच खर्रा, सिगरेटचीही स्थिती आहे. पानटपरी बंद असल्याने अनेकांचे खर्रा खाणे बंद झाले. एवढेच नव्हे तंबाखू तयार करणाऱ्या कंपन्या बंद असल्याने सुगंधित तंबाखूही बाजारात नाही. त्यामुळे अनेकजण घरातील सौफ, ओवा यावर आले आहेत. काही प्रमाणात खर्रा मिळत असला तरी त्याचा दर्जा चांगला नाही किंवा महागात मिळत आहे.

त्यामुळे अनेकांना खर्रा खाणे बंद केले. पोलिसांच्या अनेक प्रश्‍नांना उत्तर द्यावी लागत असल्याने अनेकजण बाहेर जाण्याचेही टाळत आहे. त्यातच गृहिणीही पतीच्या व्यवसावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. महागाई, सहज उपलब्ध होत नसल्याने दारू, खर्रा, सिगरेट आदीतडे अनेकांनी तूर्तास तरी पाठ फिरविली आहे.

मनपाने जनजागृती करण्याची गरज


महापालिका कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती करीत आहे. यासोबतच नागरिकांना व्यसनमुक्तीची संधी असून त्याचा लाभ घेण्यासंदर्भातही जनजागृतीचा कार्यक्रम आखणे गरजेचे आहे. त्यामुळे काही नागरिकांना नक्कीच व्यसनमुक्त करता येईल, असेही विजय शेंडे यांनी सांगितले.

लॉकडाऊनमुळे संधी
घरीच असल्याने काहींचे व्यसन सुटण्याची शक्‍यता आहे. परंतु, व्यसनाच्या आहारी गेलेल्यांकडून ही अपेक्षा चुकीची आहे. आता लॉकडाउनच्या काळात व्यसन सोडण्याची संधी आहे. यासाठी समुपदेशन, डॉक्‍टरांचा सल्ला आवश्‍यक आहे. व्यसनमुक्ती केंद्राशी संपर्क साधता येईल. विशेष म्हणजे व्यसनमुक्तीसाठी कुटुंबांचा पाठिंबा गरजेचा आहे.
- विजय शेंडे, साहस व्यसनमुक्‍ती केंद्र, मानेवाडा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com