वैद्यकीय प्रमाणपत्र या झोनमध्ये मिळणार

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर ः स्वगृही परतणाऱ्या परराज्यातील नागरिक व कामगारांना वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी आता चिंता करण्याची गरज नाही. प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने शहरातील सर्व दहा झोनमध्ये व्यवस्था केली आहे. येथे होणारी गर्दी टाळण्यासाठी टोकन प्रणालीचा अवलंब करण्यात येणार आहे.

टोकन घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी संबंधितांना वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. याशिवाय व्यवस्था करण्यात आलेल्या मनपाच्या आरोग्य केंद्रांमध्ये पोलिस बंदोबस्तही आहे. वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची मनपाच्या वैद्यकीय चमूमार्फत आरोग्य तपासणी केली जाते. थर्मल गनच्या माध्यमातून व्यक्तीचे तापमान मोजले जाते. स्वगृही परतल्यानंतर संबंधित व्यक्तीला 14 दिवस "होम क्वारंटाईन' राहणे बंधनकारक आहे. शहराबाहेर जाणाऱ्या व शहरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा संपूर्ण तपशील मनपाद्वारे घेण्यात येत आहे, अशी माहिती मनपाच्या आरोग्य उपसंचा अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.भावना सोनकुसळे यांनी दिली.

येथे मिळेल वैद्यकीय प्रमाणपत्र

लक्ष्मीनगर झोन ः सोमलवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, कांजी हाउस
जयताळा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, हनुमान मंदिर, जयताळा मनपा शाळा

धरमपेठ झोन ः के.टी.नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, उत्कर्ष नगर, गिट्टीखदान रोड, फुटाळा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, नवीन फुटाळा गल्ली नं. 3, मनपा शाळेसमोर

हनुमाननगर झोन ः हुडकेश्वर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, शिवाजी कॉलनी नासरे सभागृहाच्या मागे

धंतोली झोन ः बाबुळखेडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, मानवता शाळेजवळ,
आयसोलेशन हॉस्पिटल, इमामवाडा पोलिस स्टेशनच्या मागे
नेहरूनगर झोन ः नंदनवन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, दर्शन कॉलनी गजानन महाराज मंदिराजवळ के.डी.के.कॉलेज रोड
गांधीबाग झोन ः महाल डायग्नोस्टिक सेंटर, नर्सिंग टॉकिज जवळ महाल पोस्ट ऑफिस
सतरंजीपुरा झोन ः मेहंदीबाग नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, राष्ट्रसंत तुकडोजी हॉल जवळ
लकडगंज झोन ः पारडी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र मनपा शाळेजवळ पारडी बस स्थानकाच्या मागे
आसीनगर झोन ः पाचपावली मॅटर्निटी होम, बाळाभाउपेठ, कमाल चौक
कपीलनगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, कपीलनगर हिंदी हायस्कूल कपील नगर
मंगळवारी झोन ः इंदोरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, बेझनबाग मैदान  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com