कुलगुरू शोध समितीने घेतली या मोठ्या पदावरील व्यक्तीची भेट, अन् विद्यापीठ वर्तुळात रंगली चर्चा...

Members of the Vice-Chancellor Search Committee met with the Governor
Members of the Vice-Chancellor Search Committee met with the Governor

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी ३० आणि ३१ जुलैला शोध समितीद्वारे मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखतीमध्ये विद्यापीठातील दिग्गज उमेदवारांनी सहभाग नोंदवला. मुलाखतीनंतर शनिवारीच शोध समितीच्या सदस्यांनी राज्यपालांची भेट घेतली. या भेटीदरम्यान समितीने अंतिम मुलाखतीसाठी पाच नावे राज्यपालांकडे देण्यात आली असल्याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात रंगली आहे.

एप्रिल महिन्यात विद्यापीठाच्या कुलगुरूपदाच्या जाहिरातीनुसार शेवटच्या तारखेनंतर ई-मेलच्या माध्यमातून जवळपास 13४ हून अधिक उमेदवारांनी अर्ज आणि बायोडाटा पाठविला. यानंतर काही दिवसांपूर्वी निवड झालेल्या तीस उमेदवारांना मुलाखतीसाठी ई-मेल पाठविण्यात आला होता. यानुसार 30 जुलैला पहिल्या टप्प्यात १५ तर ३१ जुलैला १५ अशा एकूण ३० उमेदवारांच्या ऑनलाइन मुलाखती घेण्यात आल्या.

मुलाखत देणाऱ्यांमध्ये गणित विभागाचे डॉ. किशोर देशमुख, डॉ. विनायक देशपांडे आणि एलएडी आर्किटेक्‍चर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्ज्वला चक्रदेव, डॉ. राजू मानकर, डॉ. प्रदीप कुंडल, डॉ. ज्योत्सना मेश्राम आणि इतर उमेदवारांचा समावेश आहे. या प्रक्रियेतून राज्यपालांच्या मुलाखतीसाठी अंतिम पाच उमेदवारांची नावे निवडण्यात येणार आहे. त्यापैकी एकाची निवड करण्यात येईल. ही पाच नावे नेमकी कोणती? याबाबतच्या चर्चेला उधाण आले आहे.
 

अनेक उमेदवारांची मुंबई, दिल्लीतून सेटिंग


कुलगुरू पदावर आपली वर्णी लागावी, यासाठी अनेक उमेदवारांनी आता दिल्ली आणि मुंबई दरबारी आपली सेटिंग लावण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये काही प्रमुख नावांचा समावेश आहे. मात्र, वेळेवर नेमके कुणाचे चालते याबाबत सांगता येणे कठीण आहे.

132 हून अधिक उमेदवारांनी पाठविले अर्ज


एप्रिल महिन्यात विद्यापीठाचे कुलगुरूपद रिक्त झाले. यासाठी 19 मार्चला जाहिरात देण्यात आली. या जाहिरातीनुसार 20 एप्रिलपर्यंत पात्र व्यक्तींना अर्ज सादर करावयाचे होते. 20 एप्रिल शेवटच्या तारखेनंतर ई-मेलच्या माध्यमातून जवळपास 132 हून अधिक उमेदवारांनी अर्ज आणि बायोडाटा पाठविला. त्यात विद्यापीठातील कुलगुरू, माजी कुलगुरूंसह दिग्गजांनी कुलगुरूपदासाठी अर्ज केल्याचेही माहिती समोर आली होती. यानंतर काही दिवसांपूर्वी निवड झालेल्या तीस उमेदवारांना मुलाखतीसाठी ई-मेल पाठविण्यात आला होता. यानुसार गुरूवारी (ता.30) पहिल्या टप्प्यात ऑनलाइन मुलाखती घेण्यात आल्यात. या प्रक्रियेतून राज्यपालांच्या मुलाखतीसाठी अंतिम पाच उमेदवारांची नावे निवडण्यात येणार आहे. त्यापैकी एकाची निवड ऑगस्ट महिन्याचा पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात निवड शक्‍य असल्याचे समजते.
 

प्रेझेंटेशनचे सादरीकरण


शोध समितीद्वारे प्रशासकीय, संशोधन, सध्याची शैक्षणिक परिस्थिती या विषयावर प्रेझेंटेशन सादर करण्यात आल्याचे समजते. विशेष म्हणजे नव्या शैक्षणिक धोरण आणि विद्यापीठ कायद्यावर उमेदवारांची मते जाणून घेण्यात आली. समितीमध्ये शोध समितीत अध्यक्ष असलेले अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय चहांदे आणि विद्यापीठाकडून पाठविण्यात आलेले आयआयटी कानपूरचे संचालक प्रो. अभय करंदीकर यांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com