‘उठा उठा दिवाळी झाली, वाढीव वीजबिल भरण्याची वेळ झाली’; सोशल मीडियावर मिम्स व्हायरल

राजेश चरपे
Sunday, 22 November 2020

सरकार किंवा मंत्र्यांकडून सतत वापरले जाणारे शब्द, लाइन किंवा उपक्रमाच्या टॅगलाईन वापरून ‘क्रियेटिव्ह’ मॅसेज तयार करून ते सोशल मीडियावरून प्रसारित केले जात आहे. या मॅसेजवरून उमटणाऱ्या प्रतिक्रियासुद्धा बोलक्या आहेत. काही जण तर अगदी शिवराळ भाषेतून त्रागा व्यक्त करीत आहेत.

नागपूर : वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला टीकेला सामोरे जावे लागत आहे. त्यातच सोशल मीडियावरूनही राज्य सरकारवर वेगळ्या पद्धतीने टीका होत आहे. राज्य सरकारच्या ‘माझे सरकार माझी जबाबदारी’ या टॅगलाईनवर आधारित ‘माझे वीजबिल माझी जबाबदारी, उठा उठा दिवाळी झाली वाढीव बिल भरण्याची वेळ झाली’ यासारखे अनेक पिंच पॉइंट मॅसेज वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून फिरत आहेत.

वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरून जनतेत आक्रोश आहे. वीजग्राहक संघटनाही रस्त्यावर येऊ लागल्या आहेत. विरोधकांनीही आक्रमकपणे हा विषय लावून धरला आहे. कधी ग्राहकांना दिलासा देण्याची ग्वाही देणारे ऊर्जामंत्री युटर्न घेत ग्राहकांना दिलासा देणे शक्य नसल्याचे सांगतात. त्यावरून टीका सुरू होताच पुन्हा दिलासा देण्याचे संकेत देतात.

सविस्तर वाचा - दुर्दैवी! फराळाचे पदार्थ करताना अचानक घरात पसरला धूर आणि क्षणाधार्त संसाराची झाली राखरांगोळी

या तळ्यात मळ्यात भूमिकेची खिल्ली उडविणारे मॅसेज आणि मिम्स सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंमध्ये आले आहेत. बोचऱ्या शब्दांचा उपयोग करीत विनोदी स्वरूपातील मॅसेजचे आदान प्रादान सुरू आहे. थेट कुणावरही आरोप किंवा टीका नसली तरी मोजक्या आणि नेमक्या शब्दात संबंधितांना ‘टार्गेट’ केले जात आहे.

सरकार किंवा मंत्र्यांकडून सतत वापरले जाणारे शब्द, लाइन किंवा उपक्रमाच्या टॅगलाईन वापरून ‘क्रियेटिव्ह’ मॅसेज तयार करून ते सोशल मीडियावरून प्रसारित केले जात आहे. या मॅसेजवरून उमटणाऱ्या प्रतिक्रियासुद्धा बोलक्या आहेत. काही जण तर अगदी शिवराळ भाषेतून त्रागा व्यक्त करीत आहेत.

अधिक वाचा - चला मुलांनो, सोमवारपासून शाळेत या! ऑनलाईन बैठकीत घेतला निर्णय

चर्चेतील मॅसेज
एक व्यक्ती लॉकडाऊननंतर दाढी करायला गेला असता तो दुकानदाराने लावलेला बोर्ड वाचतो...

  • दाढी - फक्त १०₹
  • ब्लेड अधिभार - २₹
  • वस्तरा भाडे - ५ ₹
  • क्रिम - ५ ₹
  • कात्री भाडे - ५ ₹
  • खुर्ची भाडे - ५₹
  • लोशन - ५₹
  • पावडर - ५ ₹
  • नॅपकिन भाडे - ५₹
  • एकूण रु. - ४७ ₹

बोर्ड वाचून ग्राहकाने विचारले : तुम्हीतर कमाल केली, दाढी फक्त १० ₹ लिहून इतर छुपे खर्च लावून ग्राहकांची लूट करता?
दुकानदार : हा बोर्ड तरी मोठ्या अक्षरात आणि शुद्ध मराठीत असल्याने तुम्हाला वाचता येतो! तरीही तुम्ही मला जाब विचारला? परंतु, महावितरणकडून अनेक वर्षांपासून महाफसवणूक सुरू आहे! त्यांचे बिल किती जणांना कळते?

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Memes against the government go viral on social media